पशुवैद्यकीय महाविद्यालयासह सावळविहीर 75 एकर- ना विखे-पाटील
अहमदनगरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर कृषी विज्ञान केंद्राची 75 एकर जागा देण्यास मान्यता पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बैठकीत निर्णय उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा देण्यास आज मान्यता देण्यात आली. मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विज्ञान केंद्राची जागा देण्यास मान्यता दिली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे ...