Posts

Showing posts with the label निमित्त

बुध्दीवानांचे राजकीय बळ लोणीत खेळ !

Image
बुध्दीवांनाचे राजकीय बळ लोणीत  खेळ  रविवार विशेष घाडगे न्यूज          ॥ शिवाजी घाडगे ॥ राजकारण हे केवळ पदांचा खेळ नसून ते बुद्धी, व्यूहरचना आणि वेळेच्या अचूक अंदाजाचा कस लागणारे क्षेत्र आहे. शनिवारी लोणीच्या क्रीडांगणावर रंगलेल्या दोन जलसंपदा मंत्र्यांच्या बुद्धीबळ सामन्याने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली. निमित्त होते जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे; मात्र त्याआड रंगणारा खेळ हा क्रीडेपेक्षा अधिक चर्चेचा ठरला .  राजकारणात बुध्दीचे बळ बाहु बळ  बुद्धीबळ हा ६४ घरांचा खेळ  मानला जातो. मात्र या सामन्यात प्रत्येक घरात केवळ सोंगटी नव्हत्या, तर वरिष्ठांचे संकेत, संघटनात्मक गणिते आणि भविष्यातील राजकीय समीकरणेही ठेवलेली होती. कुणाच्या बाजूने प्रभावशाली पाठबळ आहे, कोणाच्या चालींना वरचा कौल लाभतो—यावरच पुढील डाव ठरत होते. राजा, राणी, हत्ती, उंट, घोडे आणि प्यादी—अशी संपूर्ण फौज दोन्ही बाजूंनी सज्ज होती. तथापि अलीकडील निवडणूक निकालांनी एक वास्तव समोर आणले आहे की, कार्यकर्त्यांच्या बळावर उ...