महात्मा फुले कृषी विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण मानांकन मध्ये 36 वे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारी (एन आय आर एफ)मानांकन 36 वे मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे जाहिर करण्यात आलेल्या 2023 च्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत (एन आय आर एफ) महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे एकमेव कृषि विद्यापीठ आहे व देशातील कृषि विद्यापीठांमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने 36 वा क्रमांक प्राप्त केला आहे. सन 2016 या वर्षापासून मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे देशातील प्रमुख संस्था/विद्यापीठांसह 10 वेगवेगळ्या प्रवर्गात क्रमवारी जाहिर केली जाते. या आराखड्यात देशभरातील संस्थांची क्रमवारी लावण्याची पध्दत आहे. विविध विद्यापीठे आणि संस्थांच्या क्रमवारीसाठी व्यापक मापदंड ठरविण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे स्थापन केलेल्या कोर समितीद्वारे प्राप्त झालेल्या एकुण शिफारशींमधून ही कार्यपध्दती घेण्यात आली आहे. या क्रमवारीमध्ये शिक्षण, शिक्षण आणि संशोधन, संशोधन आणि व्यावसायीक पध्दती, पदवी परिणाम इ. निकषांचा समावेश होतो. सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्रथम...