आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मुळे अहिल्यानगर ठरला राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा
प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा घाडगे न्यूज @प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने आता आणखी एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १९ वर पोहोचली असून, राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरची नोंद झाली आहे. हा विक्रम राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अल्पावधीतच उमेदवारी जाहीर होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या घडामोडीची मोठी चर्चा रंगली. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आणि विधान परिषदेचे ७ असे एकूण १९ आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ९ आमदार असून, अजित पवार गटाचे ५, शिवसेना (शिंदे गट) चे २ तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँ...