Posts

Showing posts from September, 2025

प्रकाश पाटील यांच निधन

Image
प्रकाश पाटील यांचे निधन  जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील यांचे  धाटके भाऊ प्रकाश दत्तात्रय पाटील यांचे मंगळवारी दुःख निधन झाले असून  त्यांच्या वर अंतिम संस्कार  आज सायंकाळी वाल्मिकी तीर्थ येथे ५:३० वाजता होणार आहे.    दुखांकित.                                    उदयसिंह सुभाष पाटील.      विक्रमसिंह प्रकाश पाटील.

शिवप्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा जागर रॅली

Image
 शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवदुर्गा जागर   दुर्गामाता दौड  शहरातील विविध भागातून भगव्या झेंडा मिरवणूक तसेच भगव्या टोप्या परिधान तसेच हातात भगवा ध्वज घेऊन  युवक सहभागी .   शहराच्या  संपूर्ण भागातून ही दौड पहाटे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करून सकाळी सात वाजता निघत असते. नवरात्रीचे नऊ दिवस ही दौड निघत असते.  या दवडीमध्ये लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत तसेच युवती देखील सहभागी असतात.  शिव छत्रपति शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज रक्तगटाची युवा पिढी निर्माण व्हावी.ही पिढी सदृढ असावी, देव देश धर्माचं रक्षण करणारी असावी यासाठी नवदुर्गेचा जागर हा उपक्रम आहे.  हिंदू ग्रुप राहुरी शहर, अखंड हिंदू समाज यातील सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी असतात.यात अनेक पद्य व देशाहिताचे गीत म्हंटले जातात.  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिथे जिथे आहे तिथे तिथे देशभर या मिरवणुका निघतात, अनेक संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असतात. मोठ्या उत्साहात आणि जोशामध्ये या मिरवणुकीचे स्वागत केले जाते. महिला या ध्...

मुळाचा विर्सग 25हजार क्यूसेक

Image
मुळाचा विर्सग आता 25 हजार  मुळा माई दुथडी भरून वाहतेय  करन्ट लोकेशन @घाडगे न्यूज  नगर जिल्ह्यातील धरणाच्या धरण क्षेत्रात सातत्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत असल्याने मुळा धरणाचा पूर नियंत्रण कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसत आहे . राहुरीच्या मुळा धरण पाणीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून मुळा नदी पात्रात 25 हजार क्यूसेक ने पाणी विर्सग सोडला जातोय शनिवारी 20 हजार क्यूसेक पाणी विर्सग वाढवण्यात आला होता आता रविवारी सकाळी आणखी 5 हजार क्यूसेक पाणी वाढविले पाणी जास्त आले तर आणखी पाणी विर्सग वाढू शकतो असे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दूरध्वनीवरून बोलताना सागितले तर  कर्मचारी संध्या धरण क्षेत्रात कार्यरत असून धरण पाणी साठ्यावर लक्ष ठेवून आहेत  मुळा धरणसाठा ऑगस्ट अखेर 99 टक्के पर्यंत पोहोचला असून धरणाच्या परिचलन सूची निर्देशाप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात धरण भरल्याचे जाहीर केले जाते . गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र व लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे . मुळाधरणाच्या नजीकच्या भागात राहुरी , पारनेर कडील भागात जोरदार पाऊस होत असल्या...

राहुरीच्या पोलिस पथकाचा गौरव

Image
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पथकाचा स्नेहालय कडुन गौरव  लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खुनाचा गुन्हा   उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच तपासी पथकाचा  पथकाचा स्नेहालयाकडून गौरव करण्यात आला  चार अल्पवयीन पीडीतांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्या बाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्या कडून राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ  पथक नेमून सदर माहितीची शहानिशा करणे कामी दवणगाव तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडीता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी बजरंग कारभारी साळुंके, शितल बजरंग साळुंके दोघे राहणार दवणगाव यांना अटक करण्यात आली होती अटकेदरम्यान गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर याच्याबाबत आ...

जिल्ह्यातील पंचायत समिती संभाव्य संभापती आरक्षण सोडत

Image
पंचायत समिती सभापती  ठरणार ७ ऑक्टोंबर रोजी  प्रतिनिधी- @घाडगे न्यूज   अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत होईल    ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच निर्देशानुसार ही सोडत प्रक्रिया पार पडत आहे. अकोले पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी एकूण १३ पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती (महिला)साठी १, अनुसूचित जमाती (महिला)साठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) २, सर्वसाधारणसाठी ३ आणि सर्वसाधारण (महिला)साठी ३ पदे आरक्षित आहेत. नागरिका...

राहुरीत नाथ प्रतिष्ठान आयोजित दांडिया महोत्सव

Image
राहुरीत नाथ प्रतिष्ठाण च्या पुढाकारातून  भव्य रास दांडिया उस्वोव सुरु झाला असून नवरात्री निमित्त सुरु आहे  सामाजिक संस्था नाथ प्रतिष्ठानच्या वतीने  रास दांडिया महोत्सव शुक्रवारी २६ सप्टेंबर पासून  सुरू झाला असून, ३० सप्टेंबर पर्यंत  चालणार आहे.   महोत्सवात मुलींसाठी सायंकाळी ७ ते ८.३० आणि महिलांसाठी रात्री ८.३० ते ११ या वेळेत गरबा-दांडियाचा उत्सव साजरा करण्यात येतो. नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक  सौरभ उंडे यांनी शहरातील सर्व महिलांना आणि तरुणींना आवाहन केले की, “ दांडिया महोत्सव सर्वांसाठी खुला असून, प्रत्येक स्त्रीने त्याचा मनमुराद आनंद घ्यावा.” सध्याच्या नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया नृत्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे कार्यक्रम विशिष्ट उच्चभ्रू गटापुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. याच्या पार्श्वभूमीवर, राहुरीतील सर्व समाजघटकांतील महिलांना एकत्र आणून सामाजिक समता आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा उपक्रम नाथ प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवत आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकता, आनंद, संस...

लाचखोर पोलीसाला चार दिवसाची पोलीस कोठडी

Image
लाचखोर पोलीसाला चार दिवाची पोलीस कोठडी  रहाता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अनिल गवांदे याने डप्पर चालु ठेवायचा असेल तर 20 हजार रुपये हप्ता महिन्याला द्यावा लागेल 20हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेला पोलीस कर्मचाऱ्याला शुक्रवारी राहाता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे  अनिल गवांदे याने आपण ही लाच कोणासाठी स्विकारली याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे  अनिल गवांदे राहाता तुरुंगात असताना त्याची पत्नी देखील पोलीस खात्यात कामावर आहे म्हणजे पोलीस नवरा तुरुंगात व बायको कामावर  सबधीत तक्रारदार याचा डप्पर चार दिवसा पुर्वी देखील पकडला होता त्यावेळेस अशी चर्चा रंगलीय 

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या सचिव पदी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाॅ प्रशांत बोडखे

Image
महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या नियामक मंडळाच्या सचिवपदी डॉ. प्रशांत बोडके यांची निवड प्रतिनिधी- महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत उत्साहात संपन्न झाली. यावेळी झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांची नियामक मंडळाचे सचिव म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली. हा कालावधी  पाच वर्षासाठी  आहे. या निवडीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. व्यंकटराव मायंदे, डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, डॉ. रामकृष्ण मुळे,  सुदाम अडसूळ,  अतुल मारणे उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था, पुणे (Institution of Maharashtra  Agricultural Technologists - IMAT) ही एक नोंदणीकृत संस्था आहे, जी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कार्य करते. ही संस्था कृषी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी स्वतंत्रपणे कार्य करते. या संस्थेचे उद्दिष्ट कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ...

कोतवालीचा खाकीतील देवमाणूसाचे "प्रताप" बंगाली माॅडेलने केले बलात्काराचे आरोप

Image
 खाकीतील देवमाणसाचे "प्रताप" बंगाली जादु - नयनी  "ज्योतीश्री" चे बलात्काराचा आरोप  स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे   कोतवाली पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस निरीक्षक दराडेंचा दरारा संपवला तो एका बंगली स्त्री च्या  बलात्काराच्या आरोपाने आणि बलात्कार एकदा केला नाहीतर अनेक वेळी आपल्यावर अत्याचार केला  असा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात प्रताप दराडे याच्या विरोधात दाखल केला.  यामुळे दराडे याना शेवटी मुख्यालयात हलविण्यात आले आहे ते किती दिवस येथे थांबतील हे सम-जेल?  कोतवाली पोलीस ठाण्याचे व राहुरीचे तात्कालिन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणजे खाकीतील देवमाणूस   याच्यावर एका बंगाली माॅडेल स्त्री ने बलात्कारांचे आरोप केल्याने प्रताप दराडे याचे करिअरला थक्का बसला आहे  त्या -स्त्री ने  प्रताप दराडे याची झाज उडविली   आरोप खरे की खोटे हे आता न्यायालय  ठरविल मात्र जेव्हा प्रताप दराडे पोलीस सेवेत हजर झाले अण अंगावर खाकी पाहून त्याच्या कुटुंबीयांच्या  डोळ्यातून आनंद आश्रू वाहीले असतील यशाला गवसनी घा...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना भारतीय पोलीस सेवेतील पदोन्नती

Image
घाडगे @न्यूज  अहिल्यानगर चे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सह 12 अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस प्रशासन सेवेत पदोन्नती  शासन आदेश निर्गमित 

शनि शिगणापुर देवस्थान सरकार जमा

Image
शनि शिगणापुर देवस्थान सरकार जमा आदेश निर्गमित  बेक्रींग @घाडगे न्यूज  पारदर्शक कारभारा साठी येणार नवीन विश्वस्त जगा वेगळे देवस्थान म्हणून खात्यी असलेले व अनेकजण येथे साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून येत असतात मात्र येथे शनिलाच विश्वस्ताची साडे साथी लागली होती की काय  बनावट अ‍ॅप मुळेच ...अण बोगस नोकर भरती आणखी बरेच काही  जगा वेगळे देवस्थान शनि  झाले  देवस्थान सरकार जमा  बोगस अ‍ॅप, मुस्लिम कर्मचारी, उपकार्यकारी आत्महत्या या सह अनेक कारणावरून सोमवारी महाराष्ट्र सरकारने शनिशिगणापुर देवस्थान वर नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या कडे तुर्त कारभार सोपवण्यात आल्याने संध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले 

कोतवालीचा वाली त्याला बलात्काराची गाली

बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  कोतवालीचा वाली त्याला  बलात्काराची गाली  नगर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे  पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दराडुन सांगितले वेळो वेळी पैसे मागितले  दरम्यान संबधित महिला आपल्याला ब्लॅकमेलिंग करीत असल्याचा दावा प्रताप दराडे यांनी केला आहे  प्रताप दराडे हे राहुरी पोलीस ठाण्याचे तात्कालिन पोलीस निरीक्षक असून त्याची राहुरीतुन बदली झाली तेव्हा राहुरीकर रस्त्यावर आले होते आता एका महिलेनेच त्यांना रस्त्यावर आनल्याची चर्चा आहे  काही दिवसापुर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात एका पोलीस व एका राजकीय नेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने कारवाई केली होती 

चिंचोली येथे फटाका साठ्यावर छापा

Image
फटका साठ्यावर छापा ? ? बेक्रींग @घाडगे न्यूज  चिंचोली येथील फटाका साठ्यावर पोलीसाचा छापा 31 लाख 85 हजाराचा फटाका साठा आढळून आला असून दुकान सिल करण्यात आले असून पुढील कारवाई साठी  अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे   रविवारी रात्री पोलीसांनी ही धाडसी कारवाई केली   दिवाळी पुर्वीच राहुरी पोलीसांनी मोठी कारवाई केली  राका नामक व्यक्तीचे हे फटाका साठा असल्याचे समजते नमके फटाका परवाना कसा आहे यावर पुढील कारवाई पोलीस ठरवतील

आमदार शिवाजी कार्डिले यांना आवडली राहुरी अण राहुरीला कार्डिले

Image
आमदार शिवाजी कर्डिलेंना  आवडली राहुरी अण राहुरीला कार्डिले ...! रविवार विशेष घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  अलिकडेच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मी राहुरी सोडणार नाही मतदार संघाची पुर्णर रचना होणार आहे आणि मी तीकडे जाणार आहे अशा वावड्या कोणी तरी उठवत आहे तेव्हा मी कोठेही जाणार नाही असे एका कार्यक्रमात ठणकावून सागितले   आमदार शिवाजी कर्डिले हे  नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे वास्तव्यास आहेत म्हणजे राहुरीत नाही असे असताना देखील ते राहुरी विधानसंभा मतदार संघात आमदार म्हणून तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत म्हणजे आमदार झाले आहेत तसे त्याचे शिक्षण देखील अल्प मात्र माणुसकी शाळेचे ते  हेडमास्तर आहेत  मागील वेळेस माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडुन आले पहिले अडीच वर्ष ते राज्य मंत्रिमंडळात देखील होते अचानक शिवसेनेचा एक गट बरोबर घेत माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पन्नास आमदार बरोबर घेऊन भाजपाला जाऊन मिळाले व मुख्यमंत्री झाले नंतर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार घेऊन गेले म्हणजे दोन मातब्बर पक्ष भाजपाने केद्रीय नेतृत्वाच...

पावसाच्या शक्यता नगर जिल्हातील नागरिकांना सावधानतेचा ईशारा

Image
पावसाची शक्यता नगर जिल्हावासियाना सावधानतेचा ईशारा  @ प्रतिनिधी-     भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १९ ते २३ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,३५० क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४७६९ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा १,११५ क्युसेक, मुळा धरणातून १०,००० क्युसेक, घोड धरणातून ७००० क्युसेक, सीना धरणातून १,६२८ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धर...

राहुरी शहरात रत्यावर खड्डे की खड्यात रस्ता

Image
राहुरी शहरात रस्त्यावर खड्डे  की खड्यात गेला रस्ता... @प्रतिनिधी- श्रेयस लोळगे    खराबच्या रस्त्याच्या विरोधात    नाथ प्रतिष्ठानचा मोर्चा; खड्यात  अंघोळ करत युवकाने नोदविला प्रशासनाचा निषेध राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, सतत होणारे अपघात, आणि नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने  मोर्चा काढण्यात आला. संस्थापक सौरभ उंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले  राहुरी नगर परिषदेवर  काढून ढिसास प्रशासनाला जाग यावी म्हणून खडयात आघोळ केली  यावेळी सौरभ उंडे म्हणाले नवरात्र उत्सवाच्या आधी राहुरी शहरातील खड्डे न बुजवल्यास पुन्हा राहुरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा त्यांनी प्रशासनाला इशारा दिला.,  यावेळी नाना शिंदे, सचिन बोरुडे,, जानवी उंडे,साक्षी लोळगे, सीमा उंडे नूतन उंडे आदींनी आपलेमनोगत व्यक्त केले.  पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पाण्याने भरतात, प्रवास करणार्यांना खड्याचा अंदाज न आल्याने आपघातला समोर्य जावे लागते   नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक ...

मनातला आवाज झाला जनतेचा

Image
आवाज जनतेचा बेब प्रोर्टल  जनतेचा आवाज झाला ...! शिवाजी घाडगे @घाडगे न्यूज  मनातला आवाज झाला जनतेचा  श्रीकांत जाधव या पत्रकाराने एक वर्षापासून आवाज जनतेचा ही ईलेट्राॅनीक माध्यम बेब प्रोर्टल सुरु केले अण रविवारी 14 सप्टेंबर याला   एक वर्ष पूर्ण झाले म्हणजे  पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला आणि एखाद्या प्रस्थापित माध्यमाला देखील एवढी मोठी श्रोत्यांची साथ मनापासून मिळेल एवढया मोठ्या संखेने नागरीक येथे जमले होते पावसाची सत्तधार सुरु तसा पाऊस पडला तरच नवीन पिक जोमात येत असते हाच पाऊस भविष्यात बातम्या जणु काही पेरत होता ही भावना आलेल्या प्रतेकांच्या ठाई  असताना श्रोत्यांनी भरभरून प्रेम  ही वाखान्या जोगी गोष्ट आहे एकी कडे प्रिन्ट मिडीया आलेली मरगळ तसेच  व मोठी न्यूज चॅनेल चे गाव कुसावरील प्रश्ना कडे होणारे दुर्लक्ष मुळे आज स्थानिक बेब प्रोर्टल जोरात आहेत हे आवाज जनतेने सिध्द करुन दाखवले  तस बातमीला व पत्रकाराला गावाच ठिकाण याचे बंधन नसते मात्र काही जण याच भांडवल करत आपली जागा सोडायला तयार नाहीत  ...

स्वच्छता अभियान सेवा म्हणून राबवा-मुख्यकारी अधिकारी आनंद भंडारी

Image
स्वच्छता अभियान सेवा म्हणून  ग्रामपंचायतीनी उत्तम राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी- आनंद भंडारी प्रतिनिधी -  अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५   स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहीम १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२५ साठी "स्वच्छोत्सव" ही थीम निश्चित केली असून खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत   शनिवारी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोहिमेचा शुभारंभ तालुका व गाव पातळीवर परिसर स्वच्छतेच्या उपक्रमाने होत आहे. स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची निवड करून मॅपिंग व साफसफाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – संस्था, प्रतिष्ठान व गर्दीच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येईल. सफाईमित्र सुरक्षा शिबिरे – सफाई...

परित्यक्तया महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्री प्रदर्शन

Image
परितक्तया महिलांनी बनवलेल्या  ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ टीम @घाडगे न्यूज परितक्त्या महिलांना सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत असून, या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सर्वंकष व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे  प्रतिपादन महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले. आम्रपाली गार्डन येथे महिलांच्या सामर्थ्याला व स्वावलंबनाला नवी दिशा देणाऱ्या दोन दिवसीय  ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’  उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न  झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, पत्रकार  सुधीर लंके, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, विनायक देशमुख, नितेश बनसोडे, योगिता सत्रे, प्रवीण कदम, 'उमेद'चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते. आर. विमला यांनी आपल्या भाषणात परितक्त्या महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा वे...

कृषी विकासाला प्राधान्य ना.रावल

Image
कृषी विकासाला प्राधान्य देणारे शासन-पणन मंत्री जयकुमार रावल टीम @घाडगे न्यूज   – कृषी विकासाला प्राधान्य देणारे हे शासन आहे. राज्यात पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करून थेट विक्रीची व्यवस्था पणन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अहिल्यानगर उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले. अहिल्यानगर येथे दीड कोटी रुपयांचा संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चिचोंडी पाटील येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डीले, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार बबनराव पाचपुते, भानुदास कोतकर, अक्षय कर्डीले, दिलीपराव भालसिंग, अविनाश घुले, सचिन जगताप, भाऊसाहेब घोटे, सुरेंद्र गांधी, जिल्हा उपनिब...

साईबाबा मंदीर परिसरात 12 अल्पवयीन मुले ताब्यात

Image
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात 12 अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेत आधार गृहात रवागी तसेच त्यांच्या करवी काम करुन घेणाऱ्या अथवा भिक्षा मागायला लावणाऱ्या  पालकांवर गुन्हे शिर्डी पोलीसा करवी दाखल करण्यात आले आहेत.  दाखल केले   शुक्रवारी शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री,फुलांची विक्री ,फोटो विक्री करणे ईत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात. किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली.   यात  बारा मुले यांची सुटका करण्यात  यश आले आहे.  बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आले व बालकल्याण समितीने या बाराही मुलांना संगमनेर येथील व श्रीरामपूर येथील आधार गृहामध्ये रवानगी केली आहे.      केवळ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी आधारगृहात  करण्याइतपतच ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस...

शौचालय ड्रेनेज मध्ये पडुन एकाचा मुत्यू

Image
ड्रेनेज टाकीने घेतला एकाचा बळी  बेक्रींग @पत्रकार शिवाजी  शौचालय मैला टाकीत पडुन देवळाली प्रवरा येथे एकाचा मुत्यू  जालिंदर अण्णा देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव असून परिसरात शोक कळा पसरी आहे  ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे रात्र असल्याने शवविच्छेदन करता येत नाही  गुरुवारी सुयोदया नंतर होईल शवविच्छेदन

राहुरी फॅक्टरीवर राज्य मार्गावरील रस्ता रोको आंदोलन अडकले जिल्हाधिकारी

Image
राहुरी फॅक्टरीवर रस्ता रोको आंदोलनात अडकली जिल्हाधिकाऱ्यांची  गाडी..... आजची बातमी @घाडगे न्यूज  नगर मनमाड महार्गावर राहुरीत राहुरी फॅक्टरीवर रस्ता रोको आंदोलन बुधवारी करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या मोठ्या रोषाला संबंधित विभागाला समोरे जावे लागले तर नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे शिर्डी कडे जाणारे वहान जाण्यास देखील मज्जाव झाला मात्र त्यांनी स्थानिक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बोलावून घेत आंदोलनाची  चौकशी केली  पोलीस निरीक्षकांनी या आदोलना संदर्भात निवेदन रस्ता कृती समितीच्या वतीने देण्यात आले होते संबंधित काम करणारे एजन्सी व आंदोलकांची बैठकीचा तोडगा काढला मात्र आदोलक रस्ता रोको वर ठाम होते  रस्ता रोको आंदोलनात  संध्या रस्त्यावर दोन्ही बाजुनी बंदिस्त साईड गटार बनविण्याच्या कामाने रस्ता अरुंद होण्याची भिती व्यक्त करण्यात आली तर हा रस्ता नसून मरण मार्ग असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त करत शासनाचा निषेध व्यक्त केला गेल्या दहा वर्षांत या राज्यमार्गावर कोट्यवधी रुपये खर्च झाला असून अनेक निष्पाप प्रवाशांना जिव गमावा लागला आहे शिर्डी व शनिशि...

वांग्याला तेजी शेतकरी खुश

Image
बेक्रींग @ घाडगे न्यूज  पावसाने भाजीपाला उत्पादन कमी झाल्याने वांग्याला आला सफरचंदाचा भाव आला आहे  गणपती विसर्जन नंतर वांग्याच्या भावात मंगळवारी तेजी आली असून एका कॅरेकटला 1081 रुपये भाव मिळाला नाशिक मार्केटला मिळाला आहे . असून ठोक भाव म्हणजे 60 रुपये किलो भाव पोहचला सध्या पावसा मुळे भाजीपाला उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला भाव चांगले असणार असल्याचे बोलले जाते  पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने भाजी पाल्याचा तुटवडा भासत आहे  दरम्यान किरकोळ वांगे विक्री 120 रुपये  किलोने होत आहे .  

मुळा धरणातून विर्सग वाढविला

Image
मुळाच्या विर्सगात वाढ  टीम @घाडगे न्युज  नगर जिल्हाची जलसंजवनी म्हणून ओळखले जाणारे राहुरी च्या मुळा धरणाची पाणी विर्सग वाढवण्यात आला असून 4000 हजार क्यूसेक ने मुळा नदीपात्रात पाणी विर्सग होत असून नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.   मुळाची पाणी साठवण क्षमता 2600 हजार दशलक्ष घनफूट असुन धरण संध्या 98 टक्केच्या वर पोहचला आहे मंगळवारी  मुळा धरणाच्या पाणी साठ्यात आवक वाढल्याने मुळा नदीपात्रात 4000 क्यूसेक पाणी विर्सग होणार असल्याचे सिंचन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे  धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.   नदीकाठच्या गावांनी सतर्क रहाण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.