बेकायदेशीर ड्रोन उडवली रात्रीची झोप मात्र उडवणारे मास्टरमाईड कोण
बेकायदेशीर ड्रोनने उडवली झोप; ‘मास्टरमाईंड’चा शोध अद्याप कायम ड्रोन।शिवाजी घाडगे राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींनी नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. सुरुवातीला एखाद-दुसरा ड्रोन दिसल्याच्या चर्चा होत असताना पुढे अनेक गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी आकाशात फिरणारे ड्रोन दुष्टीपथास पडले . त्यामुळे भीती, संभ्रम आणि विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. गेल्या तीन-चार दिवसांत या ड्रोनच्या हालचालींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तीन संशयित ड्रोन हस्तगत करण्यात यश आले असल्याने तपासाला दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. हे ड्रोन नेमके कोणी उडवले? त्यामागचा उद्देश काय होता? आणि रात्रीच्या अंधारात या हालचाली का केल्या जात होत्या? याची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. या प्रकरणादरम्यान सोशल मीडियावर आणि गावोगावी अनेक अफवांनीही उंच भरारी घेतली. ज्याच्या त्याच्या परीने विविध तर्क मांडले गेल...