Posts

Showing posts with the label राजकारतील दादा

अखेर भाजपाचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेच...

Image
अखेर प्राजक्त तनपरेआ यांना आमदारकीचा बिनविरोध गुलाल  राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून हा क्षण राहुरीच्या राजकीय इतिहासात सुर्वण अक्षरानी कोरला जाईल व राहुरीचे राजकारण पुन्हा तनपुरे कुटुंबा भोवती आले  श्रध्दा व सबुरीचा फायदा प्राजक्त तनपुरे यांना झाला असून   उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर सर्व प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडल्याने तनपुरे यांना बिनविरोध आमदार होण्याचा मान मिळाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना इतक्या लवकर विधान परिषदेची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्याचे फलित बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या...