Posts

Showing posts with the label बैठक

जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका राहुरीत

Image
 पोलीस अधीक्षक राहुरीत गणेश मंडळांशी साधणार हितगुज घाडगे न्यूज। प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखून साजरा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) राहुरीत  येणार आहेत. यावेळी ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. सोमवारी सकाळी १०.३० वाजता राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात गणेश मंडळांच्या अध्यक्षांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका मार्गदर्शन करणार असून, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, मंडप उभारणी, वीज व अग्निसुरक्षा तसेच सामाजिक सलोखा याबाबत आवश्यक सूचना करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असल्याने उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या बैठकीत करण...

राहुरी पोटनिवडणूक साठी मतदार यादी पुनरीक्षण करा-मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम

Image
 राहुरी पोटनिवडणूक मतदारयादी पुनरीक्षण  काटेकोरपणे राबवा -  मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम  राहुरी - आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या. शिर्डी येथे २२३ - राहुरी विधानसभा ' मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.  चोक्कलिंगम म्हणाले, सध्याच्या मतदारयादीतील नावांचे २००२ च्या यादीशी जास्तीत जास्त 'मॅपिंग' करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात केवळ उर्वरित मतदारांचेच आवश्यक पुरावे घ्यावे लागतील. तसेच मतदारयादीतील दुबा...

बिबट्या प्रतिबंधासाठी काम करा डाॅक्टर पंकज आशिया

Image
बिबट्याच्या प्रतिबंधासाठी काम करावे - डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज-प्रतिनिधी   जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव–बिबट संघर्षाच्या घटना वाढल्या असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.  संवेदनशील भागांमध्ये बेस कॅम्प सुरू करून तेथून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, महावितरणचे अधीक्षक अभियंता  पवार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागर...

आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवा

Image
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादन वाढवावे - संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध पिकात संशोधन करुन अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत केले आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, डिजीटल पध्दतीने शेतीसाठी पाण्याचा वापर तसेच शेतीचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध मोबाईल अॅपस्ची निर्मिती यांचा समावेश आहे. शेतीसाठी यंत्रमानव निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांचे शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करुन पीक उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटातील शेतकर्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबर संवाद साधला. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन व...

धरणातील पाण्याचा जपून वापर करा-ना.राधाकृष्ण विखे-पाटील

Image
जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा -- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील   गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री  विखे पाटील बोलत होते.   यावेळी आमदार बबनराव पाचपुते,आमदार प्रा.राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लोहमटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,    पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,  जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व स...