Posts

Showing posts with the label जत्रेवर

दु:खाचे सावट एका लोकनेत्याच्या अकाली जाण्याने

Image
 जत्रेवर दुःखाचे सावट एका   लोकनेत्याच्या अकाली जाण्याने समाजमन सुन्न  घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे   गावाची जत्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसतो, तर तो गावाच्या सामाजिक एकात्मतेचा, आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव असतो. मात्र यंदा देवळाली प्रवरा येथील हीच जत्रा सामूहिक दुःखाची साक्ष ठरत आहे. दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे आजोळ  या गावाने आपला लाडका भाचा गमावला गावाचा लाडका ‘दादा’ अकस्मात विमान अपघातात निधन पावल्याने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. देवळाली प्रवरा हे दादांचे आजोळ. केवळ नात्याने नव्हे, तर भावनेने, जबाबदारीने आणि सामाजिक ऋणानुबंधाने ते या मातीशी जोडलेले होते. बालपणापासूनच त्यांनी गावातील सामान्य माणसांशी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिला यांच्याशी आपुलकीचे नाते जपले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एखाद्या नेत्यापेक्षा घरातील आधारवड हरपल्याची भावना समाजात पसरली आहे. खंडोबा यात्रेचा उत्सव हा गावाच्या सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो. या यात्रेच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, नाती घट्ट होतात, मतभेद विसरले जातात...