खेळ अपयश पचायला शिकवतो-कुलगुरु पाटील
खेळ अपयश पचायला शिकवतो - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये जीवनात उपयोगी पडतील असे गुण विकसीत होतात. क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे संघभावना जागृत होते, अंगमेहनत झाल्याने शरीर सृदृढ होते, नेतृत्वगुण वाढीस लागतात, नियोजनाची कला वृधींगत होते, चारित्र्यसंपन्नता वाढीला लागते. याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात होवून व्यक्तीमत्वाचा विकास होतो. खेळाच्या स्पर्धेत सर्वांनाच यश मिळतेच असे नाही. तुम्हाला अपशय सुध्दा तितक्याच खिलाडूवृत्तीने स्विकारता आले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात क्रीडा भवनात दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, काष्टी येथील कृ...