बाबांनी तारले केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत
बाबांनी ‘तारले’ केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीत रविवार विशेष।शिवाजी घाडगे शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राजकारणाचा गंध नसलेले आणि प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. पंढरपूरमधून निवडून येण्याची अपेक्षा असताना शिर्डीतील हा पराभव आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हेही नगर दक्षिणमध्ये पराभूत झाले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार केला होता. मात्र ते साध्य झाले नाही आणि अखेरीस पवार यांनी दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांना राज्यसभेची संधी दिली. यानंतर रामदास आठवले आणि दिवंगत शिवाजी कर्डिले हे दोघेही भाजपसोबत राजकारणात सक्रिय झाले. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत आठवले भाजपसोबत असले तरी ते सर्वच पक्षांना परवडणारे नेते मानले जातात. कार्यकर्त्यांना कोरे लेटरपॅड देऊन काम करण्याची संधी ...