जिल्हा बॅके साठी खासदारांची खास आघाडी
जिल्हा सहकारी बँकेसाठी खासदारांची खास आघाडी! खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे करणार नेतृत्व अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत साखर कारखानदारांनी एकजूट केल्यानंतर आता जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये बाजूला पडलेल्या घटकांनीही एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात पर्यायी आघाडी उभी राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घडामोडींमुळे बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत साखर कारखानदार आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता या सत्तासमीकरणांना पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार एकत्र येत आहेत. समविचारी घटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत आ...