सुंदर शिर्डी साठी 50 कोटी निधी मंजूर-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
शिर्डी सुशोभीकरण आराखड्यास ५२ कोटीचा निधी मंजूर -महसूल मंत्री विखे पाटील शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी शहरातील विविध भागातील नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिर्डी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी सतिष दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, प्रतापराव जगताप, कमलाकर कोते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या ...