पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी यांचा मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केला गौरव
पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले नौदलातील अधिकारी साईनाथ गोविंद दळवी यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी गौरव केला आहे घाडगे न्यूज @विषेश प्रतिनिधी मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले. मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे संपूर्ण जगास समजले की समुद्र मार्गे ही दहशतवादी हल्ला होऊ शकतो. भारतात केंद्र सरकारने या हल्ल्याची तातडीने दखल घेऊन सर्व सागरी यंत्रणा बळकट केली. महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थानिक सागरी घटक म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम, मत्स्य विभाग, सागरी पोलीस स्टेशन, भारतीय नौदल, तटरक्षक दल, बीएसएफ या सर्व घटकांकडून एकत्र करून संयुक्त प्रभावी सागरी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. सागरी पोलीस घटकाचे पोलीस आयुक्त व सागरी जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक या समितीचे अध्यक्ष असून त्यांचेच मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा प्रभावीपणे करण्यात येत आहे. याच सागरी सुरक्षा यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी यांची पोलीस नौका विभाग व सागरी स...