Posts

Showing posts with the label नवीन तंत्रज्ञान

डाॅ सुनील कदम यांना कृषी संशोधन पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Image
कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांना उत्कृष्ट कृषि संशोधक 2025 या पुरस्काराने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्याच्या चारही विद्यापीठाच्या 53 व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात आला.  याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतिकूलपती अॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री  आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश विटेकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि)  विकास रस्तोगी, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श...