जलव्यवस्थापन कृतीपंधरवाडा
जलव्यवस्थापन कृती पंधरवडा - जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन आदी विषयावर जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. पाथर्डी तालुक्यात आयोजित कार्यशाळेत उप विभागीय कृषी अधिकारी भूषण उबाळे व तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांनी मिश्र पिक पद्धती तसेच पिकाला आवश्यक असणारी पाण्याची गरज याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वितरण बांधकाम विभाग कोळवाडी, तालुका कर्जत येथे आयोजित कार्यशाळेत कार्यकारी अभियंता धायगुडे प्रमुख वक्ते सुपेकर यांनी मार्गदर्शन केले. मुळा पाटबंधारे विभागामार्फत नेवासा येथे कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे होते. कृषी पर्यवेक्षक विलास जाधव यांनी जमिनीची सुपीकता यावर मार्गदर्शन करत ऑरगॅनिक कार्बनचे सुयोग्य प्रमाण, जैविक खतांचा वापर,आडवी नांगरणी व पेरणी याबाबत मार्गदर्शन केले. धनंजय हिरवे यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध...