Posts

Showing posts with the label धक्कादायक वास्तव

सिल ठोकले रिपोर्ट आला निल

Image
  सील ठोकले; आला रिपोर्ट ‘निल’ धक्कादायक वास्तव श्रद्धेचा बाजार | शिवाजी घाडगे स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून विशेष तपास पथकाने  खरातच्या कार्यालयासह इशान्येश्वर मंदिर परिसराला सील ठोकले आहे. या कारवाईदरम्यान तंत्र-मंत्राशी संबंधित साहित्य, उत्तेजक स्प्रे, दोरे, गंडे आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्तीमुळे प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला आहे. दरम्यान, सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अशोक खरातचा एचआयव्ही तपासणी अहवाल ‘निल’ (निगेटिव्ह) आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांवरील कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, अधिकृत अहवालानंतर या चर्चांना आळा बसला असून संबंधितांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याचे समोर आले आहे. उत्तेजित औषधाच्या अती सेवनाने त्याला अर्धाग वायु चा झटका आला मात्र त्याच्याच भक्त डाॅक्टर ने तत्परता दिखवल्याने अशोक खरात बचावला  अशोक खरातने अत्यंत आत्मविश्वासाने...