उमेदवारांनी जाहिराती प्रमाणीकरण करून घ्या-डॅा पंकज आशिया
उमेदवारांनी जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक -डॉ.पंकज आशिया जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य...