शेती साठी आता यात्रिकरण गरजेचे डाॅ तुळशीदास बास्टेवाड
आता शेतीसाठी कृषि यंत्र गरजेचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांचा तुतवडा भासत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे सध्या जिकिरीचे बनत आहे. आधुनिक पध्दतीने शेती करणे होय. आधुनिक शेती करत असताना मजुरांचा तुटवडा तसेच त्यांची कमी होत असलेली कार्यक्षमता यावर मात करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशिदास बास्टेवाड यांनी केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी आणि कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. बास्टेवाड बोलत होते. यावेळी स...