Posts

Showing posts with the label ठोकले टाळे

राहुरी खुर्द तीव्र पाणीटंचाई विरोधात महिला अक्रमक

Image
राहुरी खुर्दमध्ये पाणी मिळत नाही  ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी ठोकले टाळे राहुरी ।   राहुरी खुर्द  तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थ हैराण झाले   असून संतप्त रहिवाशी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन बुधवारी करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आदोलन छेडले  “जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपस्थित नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यही कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलां म्हणाल्या की, “आम्ही नियमितपणे व वेळेवर पाणीपट्टी भरत आहोत. मात्र तरीही नागरिकांना पुरे...