राहुरीची पोट निवडणूक उमेदवार नाही दिशा ठरवणारी लढाई
राहुरी पोटनिवडणूक उमेदवार नाही, तर दिशा ठरवणारी लढाई स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज ॥ शिवाजी घाडगे ॥ राहुरीची संभाव्य पोटनिवडणूक ही केवळ एका रिक्त आमदारकीसाठीची लढाई राहिलेली नाही. ती आता तालुक्याच्या राजकीय दिशेचा, पक्षीय समीकरणांचा आणि नेतृत्वाच्या अस्तित्वाचा कौल ठरणार आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनाने निर्माण झालेली ही राजकीय पोकळी अनेकांसाठी संधी आहे, तर काहींसाठी अस्तित्वाची परीक्षा. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे : “वेट अँड वॉच” की “हाय रिस्क डिसिजन”? प्राजक्त तनपुरे यांची आजची भूमिका अलर्ट आहे, पण ती निष्क्रिय नाही. त्यांच्याकडे तीन स्पष्ट पर्याय दिसतात— राष्ट्रवादीत राहून दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची वाट पाहणे स्वतंत्र निर्णय घेऊन नव्या राजकीय वळणाकडे जाणे हिंदुत्वाच्या मुद्द्याशी थेट किंवा अप्रत्यक्ष जुळवून घेणे गळ्यात दिसणारे भगवे उपरणे ही केवळ प्रतिकात्मक बाब नाही. ती राजकीय चाचपणी आहे—जनमत कुठे झुकतेय, हे पाहण्याची. राहुरीत हिंदुत्वाचा मुद्दा निवडणूक जिंकवू शकतो, हे शिवाजी कर्डीले यांच्या विजयाने आधीच सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी...