विज्ञान मेळाव्यात ईश्वरी तोडमल यश
ईश्वरी तोडमल चे राज्यस्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात यश सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथील दहावी ईश्वरी सुनील तोडमल हिने अखिल भारतीय विज्ञान मेळावा या राष्ट्रस्तरीय स्पर्धेमध्ये विभाग स्तरीय प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले . राज्य विज्ञान संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळवा नुकताच रत्नागिरी येथे पार पडला राज्यातून आलेल्या 16 स्पर्धकापैकी ईश्वरी ने छान कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या मेळाव्याच्या अनुषंगाने तिने आहारातील भरड धान्य बाबत स्थिती जाणण्याकरीता तिच्या वसाहतीतील शंभर कुटुंबाचे सर्वेक्षण करून माहिती संकलीत केली त्या कुटूंबाना भरड धान्य आहारात वापर व जाणिव होण्याच्या दृष्टिने झुम मिटिंगद्वारे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणले होते. ईश्वरी हिने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून सावित्रीबाई फ...