साईबाबा मंदीर परिसरात 12 अल्पवयीन मुले ताब्यात
शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात 12 अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेत आधार गृहात रवागी तसेच त्यांच्या करवी काम करुन घेणाऱ्या अथवा भिक्षा मागायला लावणाऱ्या पालकांवर गुन्हे शिर्डी पोलीसा करवी दाखल करण्यात आले आहेत. दाखल केले शुक्रवारी शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री,फुलांची विक्री ,फोटो विक्री करणे ईत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात. किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. यात बारा मुले यांची सुटका करण्यात यश आले आहे. बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आले व बालकल्याण समितीने या बाराही मुलांना संगमनेर येथील व श्रीरामपूर येथील आधार गृहामध्ये रवानगी केली आहे. केवळ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी आधारगृहात करण्याइतपतच ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस...