विद्यार्थानी ज्ञाना बरोबरच खेळाला महत्व द्यावे- अध्यक्ष अरुण तनपुरे
विद्यार्थानी ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे -अध्यक्ष अरुण तनपुरे राहुरी : आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या संस्थांना पुन्हा नवसंजीवनी देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, तसेच ज्ञाना बरोबर खेळाला महत्व द्यावे असे प्रतिपादन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी केले. संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान संचालिका मीनाताई करपे होत्या. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्याला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर बंद असलेला तनपुरे साखर कारखाना सुरू करणे अत्यावश्यक आहे. कारखान्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेला हा कारखाना मुक्त करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखान्यावर प्रशासक नियुक्त असल्यामुळे अपेक्षित वेगाने निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कारखाना बंद असल्याने तालुक्यातील विकासाची गती मंदावली असून त्याचा मोठ...