Posts

Showing posts with the label अथक मेहनतीचे यश

देवळाली प्रवरा येथील सत्यजित मुसमाडे यांची इस्त्रो मध्ये निवड

Image
देवळाली प्रवरातील सत्यजित मुसमाडे यांची इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड घाडगे न्यूज।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा येथील रहिवासी सत्यजित कृष्णराव मुसमाडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था  (इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देवळाली प्रवरा परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैज्ञानिक होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडी वृत्ती आवश्यक असते. सत्यजित यांनी या सर्व गुणांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याने देवळाली प्रवरा येथून इस्रोमध्ये दाखल होणारे ते पहिले युवक ठरले आहेत, ही बाब परिसरासाठी अभिमानास्पद आहे. सत्यजित हे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कृष्णराव नानासाहेब मुसमाडे यांचे सुपुत्र होत. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा त्यांनी शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून देशसेवेत रूपांतरित करण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्...