देवळाली प्रवरात भाजपाचे कमळ पुन्हा सत्येची जित !
देवळाली प्रवरात दुसऱ्यांदा कमळाची कमाल भाजपाचा सत्ता विजय; सत्यजित कदम पुन्हा नगराध्यक्ष देवळाली प्रवरा | घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाने पुन्हा एकदा आपली निष्ठा सिद्ध केली आहे. मतदारांनी कदम कुटुंबाच्या भाजप निष्ठेला साथ देत काँग्रेसच्या ‘हाताला’ नकार दिला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यानंतर देवळालीकरांना एक विश्वासार्ह व आश्वासक नेतृत्व मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपाच्या ‘कमळा’ला . नगराध्यक्ष पदा करीता सत्यजित कदम यांना १० हजार ४१४ मते मिळाली असून त्यांनी विरोधी उमेदवाराचा ५ हजार ६९० मतांनी पराभव केला, हे विशेष उल्लेखनीय ठरते. भाजपाच्या नगरसेवकाच्या 15 जागा आल्या असून काॅगेस 4 वंचित 1,शिवसेना 1 असे 6 विरोधी नगरसेवक निवडून दिले आहेत. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर सत्ता असतानाही वेळप्रसंगी कोणतीही तमा न बाळगता मदतीला धावून येणारा नेता म्हणून मतदारांनी सत्यजित कदम यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची संधी दिली आहे. ...