Posts

Showing posts with the label सहभागी होणार 15 महाविद्यालय

कृषी उद्योजक फोरम हिताचा कुलगुरु डॉ विलास खर्चे

Image
कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी आशादायक उपक्रम – कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज।प्रतिनिधी  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेला कृषी उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि भविष्याभिमुख उपक्रम असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांमार्फत तो प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक कलाचा अभ्यास करून त्यानुसार या फोरमच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा विद्यापीठाचा अत्यंत आशादायक प्रकल्प असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती’ या विषयावरील एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. वि...