मल्टीमिडीया प्रचार प्रसार श्रीरामपूरात आयोजन
मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे श्रीरामपूर येथे केंद्रीय संचार ब्यूरो वतीने आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य ) वर्ष २०२३निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे १९ ते २१ जून कालावधीत श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो इंडियन रेड क्रॉस सोसायटी राज्य शासनाची विविध कार्यालये व श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या संयूक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली आहे. निरोगी आयूष्यासाठी निरंतर योग करने अत्यंत गरजेचे असून योग अभ्यास, विवि...