मल्टीमिडीया प्रचार प्रसार श्रीरामपूरात आयोजन

मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे श्रीरामपूर येथे 
 केंद्रीय संचार ब्यूरो वतीने आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य ) वर्ष २०२३निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे  १९ ते २१ जून कालावधीत श्रीरामपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो  इंडियन रेड क्रॉस सोसायटी  राज्य शासनाची विविध कार्यालये व  श्रीरामपूर  नगरपरिषद यांच्या संयूक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व जनतेसाठी  सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली आहे. 

निरोगी आयूष्यासाठी निरंतर योग करने अत्यंत गरजेचे असून योग अभ्यास, विविध  योगआसनांची माहिती तसेचे या आसनांपासून मिळणारे फायदे तसेच  पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या धान्यांपासून तयार करण्यात येणारे चविष्ट पदार्थ आणि विविध आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी यात धान्यांमध्ये असलेल्या  सत्वगुणांची माहिती या मल्टिमीडिया  प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी ,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या  भरडधान्यांना सुपरफूड व श्री अन्न असेही म्हटले जाते.

 या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरात सांसकृतिक कार्यक्रम, निबंध, चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून २१ जून रोजी आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १९ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता या तीन दिवशीय मल्टिमिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी  खासदार सदाशिव लोखंडे. आमदार लहू कानडे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्शिल सदस्या मीनाताई जगधने,  उपविभागीय अधिकारी किरण सावंत, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, तहसीलदार वाघचौरे, गटविकास अधिकारी प्रविण शिनारे,  सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक आदी  यावेळी उपस्थित राहतील. 

या कार्यक्रचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. असे आवाहन माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये व सहायक प्रचार अधिकारी पी. कुमार यांनी केले आहे‌.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार