महापुरुषांचे विचार स्विकारा-कुलगुरू पाटील
महापुरुषांचे विचार स्विकारा - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे समता, बंधुता व न्याय या तत्त्वांवर कार्य करणारे समाजसुधारक तसेच बुद्धिवादाला आणि तर्कबुद्धीला प्राधान्य देणारे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ होते. हंटर कमिशनच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचला. त्यातूनच निर्माण झालेली आजची कर्तबगार स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन करीत आहे. स्त्रियांच्या प्रगतीसाठी सती प्रथेचे निर्मूलन, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न, अनौरस संततीसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती असे प्रवाहाच्या विरुध्द जाऊन क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय त्यांनी घेतले. 19 व्या शतकातील परिस्थिती लक्षात घेता ब्रिटीश सत्तेच्या विरोधात न जाता सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्च केले. आजच्या काळातील महापुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी साजर्या करण्याच्या पद्धती व स्वरूप बदलणे गरजेचे असून महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे अत्यावश्यक आहे असे प्रति...