कृषी शास्त्रज्ञ सैनिकच-कृषीमंत्री अब्दुल सत्तार
कृषी सैनिक महात्मा फुले कृषी विद्यापीठातुन @पत्रकार शिवाजी घाडगे कृषि शास्त्रज्ञ चे काम सैनिक इतकेच म्हत्वाचे - कृषि मंत्री मा.ना. अब्दुल सत्तार आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदुषीत पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावर उत्तर शोधन्याची जबाबदारी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांंची आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी विविध पिकांमध्ये संशोधन करुन नवनविन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकर्यांची केलेली सेवा असून कृषि शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा.ना. अब्दुल सत्तार यांनी केले. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषि विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कृषि मंत्री मा.ना. अब्दुल सत्तार बोलत होते. य...