भोगू अशोक खरात आज काय व्हिडिओ?
भोगू अशोक खरात चा आज काही व्हिडिओ ? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे अंधश्रद्धेच्या सावटाखालील भीषण वास्तव नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसाहपासून सोशल मीडियावर समोर येणाऱ्या कथित व्हिडिओ क्लिप्समुळे या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले असून, समाजमनात अस्वस्थता आणि रोष दोन्ही तीव्र होताना दिसत आहेत. आता प्रश्न फक्त “आणखी व्हिडिओ येणार का?” इतकाच राहिलेला नाही, तर “अशा घटना इतक्या वर्षे दडपून कशा राहिल्या?” हा अधिक महत्त्वाचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. देश-विदेशात तणावपूर्ण परिस्थिती असताना, समाजाच्या अंतर्गत विघटनाचे असे प्रकार अधिक धक्कादायक ठरतात. विशेषतः महिलांवरील कथित अत्याचारांच्या आरोपांनी या प्रकरणाचे गांभीर्य अनेक पटींनी वाढवले आहे. गर्भवती महिलेसोबत अमानुष वर्तन झाल्याच्या आरोपांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. शासनपातळीवरही या प्रकरणाची दखल घेतली गेली असली, तरी जनतेच्या मनातील संताप आणि असुरक्षिततेची भावना अद्याप कमी झालेली नाही. दररोज समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे या प्रक...