राहुरी पोलीस ठाण्यात गिते यांच्या नियुक्तीचे गित सुरुच....
राहुरी पोलिस ठाण्यात प्रल्हाद गिते यांच्या बदलीचे गित सुरुच चर्चा ।शिवाजी घाडगे राहुरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली. मात्र ही बदली नेमकी नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दिलासा, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुरीत अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगरहून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना सोनई पोलीस ठाण्यातील खातेनिहाय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर गिते यांची राहुरीत एंट्री झाली. परंतु गिते यांच्याविरोधातही चौकशीचे सावट असल्याने ते राहुरीत किती दिवस टिकणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगर तालुक्यातील गंभीर आरोप नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना गिते यांनी खुनाचे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप आहे. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांना ६ मार्च २०२५ रोजी निघृण मारहाण झाली. उपचारादरम्यान २३ मार्च रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. इतक्या गंभीर घटनेनंतरही सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल...