कालव्याच्या नूतनीकरण तसेच दुरुस्ती कामाना निधी कमी पडु देणार नाही-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरण निधीची कमी पडू देणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा - महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ब्राम्हणी येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत (एम. आय. पी.) टप्पा १ मधील मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामांची दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. शिवाजी कर्डिले, आ. विठ्ठल लंघे, आ. मोनिका राजळे, आ. हेमंत ओगले, माजी आ. पांडूरंग अभंग, जेष्ठ नेते सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, बाळकृष्ण बानकर, सुवर्णा बानकर, देवीदास म्हस्के, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता, राजेश गो...