देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काॅगेस करणार भिक मागो आंदोलन-नगरसेवक दासू पठारे
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसचा 'भिक मागो' आंदोलनाचा इशारा-नगसेवक दासू पठारे देवळाली प्रवरा| प्रतिनिधी देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ १८ जुलै रोजी 'भिक मागो' आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे यांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना पठारे म्हणाले की, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांना रोज खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवरही टीका केली. "राज्यात लोकप्रतिनिधींचे सरकार असतानाही मुख्याधिकारी अजूनही प्रशासकीय राज असल्याप्रमाणे वागत असून नागरिकांच्या प्रश्नांबाबत...