शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास केंद्राचे प्राधान्य- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
शेतीचे उत्पादन वाढविण्यात केंद्राचे प्राधान्य - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान अहिल्यानगर- शेतकरी हा देशाचा श्वास आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ .एस.के.रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील उपस...