Posts

Showing posts from October, 2025

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभास महंत रामगिरी जाणार ?

Image
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास महंत रामगिरी जाणार ? घाडगे न्यूज - प्रतिनिधी  महंत नारायणगिरी महाराजां नंतर महंत रामगिरी महाराज अतिशय सुंदर भक्तांचे आध्यात्मिक प्रबोधन करीत आहेत.  असे असताना भक्तांनी महंत रामगिरी यांना एका निवेदना व्दारे प्रबोधन केले असून अशोक सहकारी साखर कारखान्यावर महंत रामगिरी यांचा अवमान झाला होता हे महंत रामगिरी कदाचित विसरले असतील मात्र भक्तगण नाही व आता महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अशोकचा गाळप हंगाम सुरु होणार असून रामगिरी याच्या हस्ते गाळप हंगाम शुभारंभ होणार असून याला महंत रामगिरी यांनी जाऊ नये असे त्यांना वाटते  ज्याच्या अधिपत्याखाली अशोक चालतो ते महिलीलेवर अन्याय  अत्याचार केल्याच्या आरोपा वरून अटक होते.  कदाचित साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असल्याने यावर असंख्य ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगार यांचे भवितव्य अवलंबून असल्याने महंत रामगिरी मोठ्या मनाने कार्यक्रमास उपस्थित राहणार असतील मात्र हे उचित आहे का  हेच ते पत्र  प्रती. प. पू. महंत रामगिरीजी महाराज, मठाधिपती, सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान, ...

देशाच्या एकता व अखंडते साठी धावण्याची स्पर्धेचे श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजन

Image
एक दौड देशकी अखंडता और एकता के लियेचे श्रीरामपूरात आयोजन  घाडगे न्यूज-प्रतिनिधी  एक दौड देश देशाच्या अखडता आणि एकता साठी अहिल्यानगर व   श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ही दौड आयोजित करण्यात आली असून यात जास्तीत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे शुक्रवारी 31 ऑक्टोबर  2025 रोजी सकाळी सात वाजता डी डी काचोळे विद्यालया पासून दौड सुरु होईल पाढरा टी शर्ट व पाढरी पॅन असा ड्रेस कोड आहे.  सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दौड आयोजित करण्यात आली आहे सदर दौड चे निमंत्रक  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,   उपविभागीय पोलीस  अधीक्षक जयदत्त भवर असून देशाच्या एकता व अखडते साठी आयोजित दौड  खेळाडु,  सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांनी  मोठ्या संखेने एकता सहभागी होण्याचे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. 

हैदराबादहून हवेत उडणारे बलुन जिल्ह्यातुन जाणारे

Image
हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेष प्रतिनिधी/घाडगे न्यूज    हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे.   ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील.   या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. ...

नगरपालिका निवडणूक आचार सहिता लागणार

Image
नगर पालिका आचार सहिता लागणार  बेक्रींग न्युज @घाडगे न्यूज   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक आचार सहिता 3 नोव्हेबरला 2025  लागण्याग्याची शक्यता ..? गेल्या वर्षांपासून नगर पालिका व नगर पंचायत वर शासकीय प्रशासकीय राज असून आता राजकीय वातावरण गरमा गरम होत असून पुढच्या महिन्यात सोमवारी 3 नोव्हेंबर ला निवडणूक आयोग   आचार सहिता जारी करेल अशी  वृत्त .   मतदार याद्या पुर्ण झाल्या आहेत  यंत्रणा तयार झाली असून  पक्ष दिवाळीचे भेटी गाठी तसेच फराळ निमित्ताने मतदारांपर्यंत पोहचले तर इच्छुक आपल्या प्रभागात संर्पक ठेवून आहे एक मतदार देणार तीन मते नगराध्यक्ष,तसेच एका प्रभागात दोन उमेदवार असे तीन मते देवुन मतदार आपला हक्क बजावणार आहे.

दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने ग्राहकांना दिवाळी निमित्त दिल्या किटल्या भेट

Image
दुध विक्रेता शेतकऱ्यांने दिली किटली भेट ! "सुखद बातमी" घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  दिवाळीत मोठ मोठ्या कंपन्या, व्यावसायिक, उद्योजक, राजकीय मंडळी आपल्या स्नेही जणांना दिवाळी भेट देऊन यंदाची दिवाळी साजरी केल्याचे आपण पाहीले असे असताना मात्र  राहुरी फॅक्टरी येथील गोपालक दुध विक्रेत्या शेतकऱ्यांने  आपल्या दैनंदिन ग्राहकांना  किटली भेट देऊन दिवाळी साजरी केली अजीत वरखडे यांनी  किटली मुळे आपण देवळाली नगर पालिकेच्या पॅलस्टीक मुक्तीला हातभार लावणार असल्याचे त्यांना वाटते पॅलस्टीक आपल्या व जनावरांच्या आरोग्याला घातक आहे कधी कधी गाईच्या पोटातून पॅलस्टीक गोळा डाॅक्टरांनी बाहेर काढल्याच्या घटना आपल्या आजुबाजुला पाहिल्या आहेत म्हणून किटली देण्याचा विचार मनात आला.  शेतकरी ते ग्रांहक यांचा आर्दश डोळ्या समोर होताच आपल्या मालाची विक्री आपण करायची तसेच शेतकऱ्याला उत्पादन घेता येते विक्री करता येत नाही हा ढबा पुसायचा म्हणून दुध केद्रावर दुध न घालता थेट या उद्देशाने दुध विक्री सुरु केली याला स्थानिक रहिवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला.  एकी कडे बोनस कमी दि...

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधरात

Image
शेतकऱ्यांकडे विकायला काहीच नाही दिवाळी गेली अंधारात....!   स्पाॅट रिपोर्ट @घाडगे न्यूज  मध्यतंरी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभे पिके सडुन गेले  हाता तोडाशी आलेले घास पाण्यात गेला  बि-बियाणे खरेदी साठी कर्ज घेतलेले वाढत असून उद्याच्या भरवशावर आज मात्र आता  विकायला काही नाही शेतकरी अन्नदाता ची यंदाची दिवाळी अंधारात साजरी केली गेली.   आपल सार गणीत कोलमडून गेले शेतीतील उत्पादन आदिक होण्या ऐवजी कायम वजावट   शेतात अतिवृष्टीचे पाणी घुसल्याने  माती देखील शिल्लक राहीली नाही होत्याच नव्हत झाल दसऱ्याला 150 रुपये किलोने विकली गेलेली झेंडूची फुले आता दिवाळीदा अवघी 50 रुपये किलोने विकली गेली मागच्या दिवाळीत 200 रुपये जोडी विकली जाणारी लक्ष्मी ( शिराई ) अवघी 100 रुपये जोडी होती तर बाजारातुन बत्ताशे गुल झाले . पणत्या आणायला देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत ज्युन्याच पणत्या  आणि विक्री साठी येणारा कुंभार देखील मातीच्या पणत्या घेऊन येत नाही कारण पणत्या बनवायला माती शिल्लक नाही   कसे बसे किराणा दुकान दाराच्या हाता पाया पडून किराणा आणला ...

दिपावली शुभ

Image
       दिपावली    च्या  हार्दिक शुभेच्छा  🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 हर्ष फुलांच्या शिपित धारा वसुंधरेची आली दिवाळी  मना मना उजळीत जावो     दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.  धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.       या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत .    दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा    !! शुभ दिपावली !! @शिवाजी घाडगे- संपादक घाडगे न्यूज  

राहुरीचा आमदार कोण

Image
राहुरीचा आमदार कोण  स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीचे दिवगंत आमदार शिवाजी कर्डिले यांचे अकस्मात निधनानंतर राहुरी विधानसंभा पोट निवडणूक होईल व यात पुन्हा भाजपाचा आमदार होणार की राष्ट्रवादीचा की अपक्ष असा प्रश्न संध्या मतदार संघात चर्चीला जात आहे.  एका युगा नंतर नव्या राजकीय युगाची सुरुवात असणार आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी तीन दशके आपल्या ताब्यात ठेवली दक्षिणेत लोकसंभा निवडणूक पराभवा नंतर पुन्हा भाजपात जात निवडणूक लढवुन राहुरीवर आपले प्रस्त प्रस्थापित केले माजी आमदार प्रसाद तनपुरे शिर्डीचे खासदार झाले येथे पोट निवडणूकीत भाजपाचे चंद्रशेखर कदम निवडुन आले नंतर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा निसटता विजय झाला पुन्हा चंद्रशेखर कदम आमदार झाले नंतर मतदार संघ पुर्णर रचनेत राहुरीला नगर, पार्थडी  मतदार संघातील काही गावे जोडली गेली यात बुऱ्हाणनगर येथील रहिवाशी नगर ग्रामीणचे आमदार शिवाजी कर्डिले पुन्हा आमदार झाले गांधी मैदानावर तसेच रतीबाचे दुध घाणारे, तरुण सरपंच दिवंगत आमदार  शिवाजी कर्डिले यांनी दिवंगत खासदार दादा पाटील शेळके य...

चित्तेचे चित्त भाजपात रमेना धनुष्यबाण हाती

Image
चित्तेचे चित्त भाजपात रमेना धनुष्यबाण हाती  घाडगे न्यूज- प्रतिनिधी   श्रीरामपूर विधान संभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराची धुरा समर्थ पणे पेलणारे भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला असून माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे . एकनाथ शिदे यांचे चिरंजीव खासदार डाॅ. श्रीकांत शिदे यांनी प्रकाश चिंते यांना शिवसेनेत घेण्या साठी विशेष प्रयत्न केले.  प्रकाश चित्ते भाजपाचे जुने व प्रखर हिंदुत्व वादी नेते म्हणून पाहीले जातात श्रीरामपूरातील भाजप वाड्यावरुन चालयायला लागल्या पासून प्रकाश चित्ते चे भाजपात चित्त लागत नव्हते अलिकडेच शासकीय कमीटी नियुक्त यांदीत प्रकाश चित्ते समर्थक डावलण्यात आले होते तेव्हा चित्ते यांनी थेट शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला  श्रीरामपूर व  ३२ गाव शिवसेनेत आता माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, हिंदु रक्षक सागर बेग, भाऊसाहेब पगारे, रवींद्र मोरे,अँड प्रशांत  मुसमाड...

खासदार शरद पवार नगरात दाखल

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज  खासदार पवार आले नगरात .  राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी अहिल्यानगर येथे दाखल झाले असून केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहीले असून जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या निवास्थानी देखील जात आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

Image
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत   घाडगे न्यूज  @ प्रतिनिधी   अहिल्यानगर  सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्यातील नुकसान ग्रस्ता साठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले असून अहिल्यानगर साठी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना आहेत.  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ को...

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर अंत्यसंस्कार

Image
आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री साडे आठ वाजता कर्डीले कुटुंबाच्या सात्वना साठी   राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील  प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला‌.   यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते,  आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब...

राजकारणातली धुरंधर हरपला राहुरीचे भाजपा शिवाजी कर्डीले यांचे दुःख निधन

Image
राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन    बातमी दुःखद/घाडगे न्यूज  @ पत्रकार शिवाजी घाडगे  जिल्हाचे धुरंधर नेते भाजपा आमदार तथा जिल्हा बॅकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भानुदास कर्डीले वय ६७ यांचे शुक्रवारी पहाटे हदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक पसरला   असून गेली ४० वर्ष हा माणूस न थकता जनते साठी उन वारा पावसात खंबीर पणे पाठीमागे उभा राहीला  तसा जनता हाच आपला पक्ष म्हणून राजकारणात सुरुवात केली अपक्ष, राष्ट्रीवादी, भाजपा, जिल्हा विकास आघाडी अस करीत आपले राजकीय बस्ताना पक्के केले.  ते आमदार होते एक दुधविक्रेता ते मंत्री असा त्यांचा जीवन प्रवास राहीला.  नगर जिल्ह्य़ातील एक सर्घष शिल व्यक्तीमत्व स्पष्ट वक्ता खमक्या आमदार म्हणून त्यांची ओळख होती पहिल्यांदाच अपक्ष म्हणून ते निवडुन आले एक आपवाद वगळतात्यांना पराभव माहीत नव्हता जिल्ह्य़ातील प्रस्तापित राजकारण्यांना त्यांनी पराभुत केले होते   बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत सरपंच म्हणून राजकारणात पदार्पण झाले जावा गाडीवर गांधी मैदानावर दुध घेऊन ये...

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळ बिबट्या कैद

Image
 पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळील पिंजऱ्यात नर बिबट्या कैद झाला असून. लोणी येथील कार्यालया जवळ हा बिबट्या पिंजऱ्यात आला  गेल्या महिन्या भरा पासुन हा बिबट्या पिंजऱ्याला हुल देत होता  आता मात्र  पिंजऱ्यात अडकला आहे  जिल्हाचे पालकमंत्री विखे-पाटील यांचा पिच्छा सोडायला बिबट्या तयार नाही असेच म्हणावे लागेल कारण मागे त्याच्या पत्नी जि प च्या माजी अध्यक्ष शालिनीताई या आपल्या नातवांना भोजन घालत असताना बिबट्या जवळुन गेला होता व आता देखील नर बिबट्या ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला आहे.  आजुन देखील बिबटे असल्याची शक्यता असल्याचे बोलले जातेच कारण परिसरात गारवा व लपण्या साठी जागा उपलब्ध आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ 71 प्रकल्पग्रस्तांना कायम नोकरी ऑडर

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज   राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात  71 प्रकल्पग्रस्तांची दिवाळी झाली गोड 71 प्रकल्पांताना दिल्या नोकरीत कायम ऑर्डर  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख  व कुलसचिव राजेंद्र पाटील यांना प्रकल्पग्रस्त कुटुंबाने दिले धन्यवाद  तात्कालिन कुलगुरु राजाराम देशमुख असताना देखील 100 प्रकल्पांताना नोकरीत दिल्या गेल्या त्यावेळेस देखील कुलसचिव म्हणून राजेंद्र पाटील होते तेव्हा एक सकारात्मक काम करणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेंद्र पाटील यांच्या कडे पाहीले जाते  आता देखील प्रकल्पांतग्रस्त जनतेला न्याय मिळाला असून राहीलेल्या प्रकल्पांतग्रस्ताना देखील विद्यापीठ प्रशासन न्याय देईल अशी अशा आहे. 

गुजरात सरकार मधील 13 मंत्र्याचे राजीनामे?

Image
बेक्रींग  @घाडगे न्यूज  गुजरात मध्ये 13 मंत्र्याचे राजीनामे  गुजरात सरकार मधील  अचानक सरकार मधील विद्यमान मंत्र्यांच्या राजीनामा नाट्याने भाजपा राजकीय अंर्तगत कलह समोर आला असून संबंधित मंत्र्यानी मुख्यमंत्री भुप्रेंद्रभाई पटेल यांच्या राजीनामे दिले.  गुजरात हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुहमंत्री अमित शहा यांचे असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पंधरावर्ष मुख्यमंत्री होते तेथुन ते थेट देशाचे पंतप्रधान झाले आता गुजरात मधील राजीनाम्या मुळे गुजरात भाजपा सरकार विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून  यांचा परिणाम महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य निवडणूकत देखील होऊ शकतो का अशी चर्चा 

राहात्याला आता बदल हवा

Image
राहात्याला आता बदल हवा ! स्षेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे   राहाता नगर पालिका नगराध्यक्ष पदा साठी नागरिकांचा मागास खुला प्रवर्गा असे आरक्षण निघाले असुन येथे प्रास्तापिताना मतदार वैतागले  असुन  नव्या दमाच्या प्रतिनिधीला येथील मतदारांची ममता आहे.  येथे  एक मराठा लाख मराठा तसेच माळी समाज यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. राहात्यात फळबाग लागवड तसेच शेती आवजारे विक्री मोठी बाजार पेठ आहे शिर्डी नजीक असल्याने प्रतेक हाताला येथे काम आहे.   गजबजलेले राहाता येथे स्वतंत्र विचाराचे कार्यकर्ते आहेत  जनतेतुन पहिल्या नगराध्यक्षा ममता पिपाडा दहा वर्ष नगराध्यक्षा राहील्या त्यांचे पती डाॅ राजेद्र पिपाडा शिर्डी विधानसंभा निवडणूक दोनदा लढले भाजपाचे उमेदवार विरोधात उभे राहुन देखील ते आज ही भाजपात आहेत त्यामुळे पिपाडा येथे निवडणूकी साठी  आपले लोक उभे करुन    आपला उमेदवार निवडुन आणतील असे चित्र संध्या तरी दिसत नाही कारण राजकीय प्रतिस्पर्धी सहजा सहजी तयार करणार नाही.  तेव्हा लोणीचे लोण कोणावर ही खमंग चर...

शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज

Image
शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज  स्पेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित महिला साठी  राखीव झाल्याने सर्वसाधारण  इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असले तरी शिर्डीत बाबा व दादा दोघेही खुष झाले असले तरी येथे बापु नाराज. तसा शिर्डीचा नगराध्यक्षपद हा साईबाबा संस्थान विश्वस्त म्हणून संस्थान विश्वस्त मंडळार जात असतो साईच्या दर्शना साठी कायम मोठमोठे व्ही आय पी यांची वर्दळ असतेच त्यामुळे त्यांचा स्वागत करण्याचा मान येथील नगराध्यक्षांना असतो.  शिर्डीत जगभरातून श्रध्दाळु येतात  मुळात साई बाबा सर्वधर्मीय आहेत सबका मालिक एक म्हणत श्रध्दा व सबुरी जगाला आपलेसे करणारे साई बाबा ही खुश असतील कारण आता साईराम यांचा त्रास कमी, समाधीवर फुले देखील टाकायला परवागी दिली गेली, सगळ्यांना वेळेत सुलभ दर्शन, बाबांच्या शिर्डीत कोणी उपाशी झोपत नाही व झोपला तर त्यांच्यावर कोणी अंगावर नवे बॅलकेट  टाकून जातो ते या हाताचे त्या हाताला कळत नाही तर बाबांच्या समाधीवर सोन्याचे हार घालणारा आपले नाव देखील सांगत...

संगमनेर महिला राज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Image
संगमनेर मध्ये महिला राज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  स्पेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  संगमनेर नगर पालिकेत माजी मंत्री काॅगेस नेते बाबासाहेब थोरात यांचे गेली पाच दशके वर्चस्व होते  आता मात्र येथे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या बरोबर दिग्गजांची प्रतिष्ठा यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे अद्याप तसे सारे काही गुलदस्त्यात आहे येथे उघड कोणीच काही मत व्यक्त करायला तयार नाही.      संगमनेर हा तसा काॅमरेड विचार सरणीचा होता नंतर काॅगेस मय झाला येथील नेतृत्व निळवंडय़ाच्या पाण्याने बहरवले ऊसा बरोबर नगदी पिके घेऊन शेतकरी समृध्द पावला पानमळे गेले मात्र विडी ओळणे कायम राहीले  साखर कारखान्या बरोबर दुध व्यावसायने धवल क्रांती केली संगमनेर ची मालपाणी यांची गाय छापची छाप महाराष्ट्र भर आज कायम आहे . तसा जिल्ह्यात संगमनेर चे वैभव भारीच आहे अतिशय समृद्ध म्हणून संगमनेर ओळखला जातो  संगमनेर नाव लौकिक वाढवण्या कामी येथील व्यावसायिक मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही   आता तर मेट्री सिटीत मालपाणी माॅलची देखील तीचकीच छाप आह...

का अस राहुरीना आपल्या समाजना नगराध्यक्ष असा

Image
का अस राहुरी समाजना साठी आरक्षीत व्हयना अस ! स्पेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  राहुरी नगरपालिका नगराध्यक्ष पद आदिवासी समाजाचे आरक्षण निघाले अण आदीवासी समाजन आनंद व्हायना....  तसा आदीवासी समाज हा रामायणा पासून प्रामाणिक आहे कारण शबरीची उष्टी बोर रामानी खाल्ले असा उल्लेख अनेक वेळा केला जातो. इतके कशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शबरीकुंभ भरविला होता व त्याला राहुरीचे आदीवासी गेले होते.  कधी काळी आदीवासी समाजातील मुले आपल्या वस्ती जवळ चिल्लर अधवा पत्ते खेळताना दिसायचे आता मात्र हेच मुले शिक्षण घेतल्याने त्यांची बोटे संगणकावर खेळु लागले. राहुरी नगर पालिकेचा नगराध्यक्ष आता आपल्या हाटीतला व्होणार म्हणून राहुरीना नगराध्यक्ष पद आदीवासीना व्हयना अस म्हणत राहुरी झाली  बावरी  जनतेतुन  थेट नगराध्यक्ष  खुर्चीवर जाऊन बसणार असल्याने  आदीवासी नगराध्यक्ष होणार हे खरे असले तरी प्रस्थापित लोक इतक्या सहजा जमु देत नसतात कारण पालिकाचा व्याव्हार मोठा असतो सहजासहजी इतराना समजता कामा नये म्हणून सगळी यंत्रणा काम करत...

श्रीरामपूरात लढेगे तो जितेगे दादा ताईची लढत लक्षवेधी

Image
श्रीरामपूरात लढेगें तो जितेगे दादा ताईची लढत लक्षवेधी सोबतीला अपक्ष स्पेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे  श्रीरामपूर नगर पालिकेत आगामी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागे साठी असलेतरी  येथे  आदिक व ससाणे अशी लढत  होणार असून अधिकृत पक्षा बरोबर  अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आज मावतील   विषेश म्हणजे महिला राखीव नसाला तरी महिला म्हणून राष्ट्रवादीच्या  अनुराधा आदिक यांच सभव्य उमेदवार मानल्या जात आहे   काँग्रेस कडुन करण ससाणे तर  दोन प्रमुख उमेदवारांसह  भाजपा कोणता चेहरा देणार  असे असताना अनेक इच्छुक आपले नशीब आजमावतील  निवडणूकीत पुन्हा  दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक कुटुंब व दिवंगत माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जंयत ससाणे कुटुंब म्हणजे विद्यमान नगराध्यक्षा अनुराधा  आणि जिल्हा बॅकेचे संचालक करण यांच्यात होणार हे निश्चित असले तरी पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहेत ससाणे हे सर्व मान्य नेतृत्व असले तरी एक मराठा लाख मराठा  मुळे मागील निवडणुक...

शेतकरीभिमुख ४२हजार कोटी योजनाचा लोकार्पन सोहळा

Image
शेतकरीभिमुख ४२ हजार कोटी खर्चाच्या कृषि योजनांचा लोकार्पन सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न घाडगे न्यूज @प्रतिनिधी  नवी दिल्ली, पुसा येथील राष्ट्रीय कृषि विज्ञान परिसरात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांसाठी ४२ हजार कोटींहून अधिक कृषि योजनांचा लोकार्पन सोहळा शनिवारी  संपन्न झाला.  यावेळी देशाचे कृषि मंत्री शिवाराजसिंग चौहान, राज्यकृषि मंत्री भागीरथ चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपन विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, मृदाशास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, जीव...

पोलीस उपनिरीक्षक साईनाथ दळवी यांचा मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केला गौरव

Image
 पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले नौदलातील अधिकारी साईनाथ गोविंद दळवी यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी गौरव केला आहे  घाडगे न्यूज @विषेश प्रतिनिधी  मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले. मुंबईतील समुद्रा मार्गे झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे संपूर्ण जगास समजले की समुद्र मार्गे ही दहशतवादी हल्ला होऊ शकतो. भारतात केंद्र सरकारने या हल्ल्याची तातडीने दखल घेऊन सर्व सागरी यंत्रणा बळकट केली. महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थानिक सागरी घटक म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम, मत्स्य विभाग, सागरी पोलीस स्टेशन, भारतीय नौदल, तटरक्षक दल, बीएसएफ  या सर्व घटकांकडून एकत्र करून संयुक्त प्रभावी सागरी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. सागरी पोलीस घटकाचे पोलीस आयुक्त व सागरी जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक या समितीचे अध्यक्ष असून त्यांचेच मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा प्रभावीपणे करण्यात येत आहे. याच सागरी सुरक्षा यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक  साईनाथ दळवी यांची  पोलीस नौका विभाग व सागरी स...

देवळाली प्रवरा नगरपालिकेत सत्तेत- जित कोणाची !

Image
देवळाली प्रवरा नगरपालिकेत कोणाचा झेंडा फडकणार  स्पेशल रिपोर्ट  घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे  स्वच्छतेत नावलौकिक मिळवलेली नगरपालिका 20 हुन अधिक राज्य व केंद्रसरकार ची बक्षीस प्राप्त राज्यात नावलौकिक प्राप्त नगरपालिका देवळाली प्रवरा नगर पालिका होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकी मुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सोशल मीडियावर " वार "सुरु झाले असून भाजपा व विरोधात सारे असे चित्र असून भविष्यात कोणकोणते पक्ष आपले झेंडे घेऊन राजकीय मशागत करतात  राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार की स्थानिक मंडळार हे देखील पाहणे उसुकत्तेचे असणार आहे तसे सगळेच्या प्रभागात उमेदवार उभे करण्या साठी सातत्य असावे लागते येथे फॉलोअर्स पेक्षा प्रत्यक्ष मतांवर अवलंबून असते राजकीय मतभेद दुर ठेवून सत्तेचा सारीपट कोण कसा खेळणार अथवा कोण कोणाच हिशोब चुकता करणार संध्या नवीन पिढीच्या हातात राजकीय सुत्रे आली आहेत  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे खुले राहील्याने खुल्या चर्चा संध्या सुरु असुन  अभी नही तो कभी नही या वृक्ती प्रमाणे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून त...

जाहिरात आपल्या कामाची

Image

इंस्टाग्राम वर अक्षेप व्हिडिओ अपलोड करणाऱ्यां दोघावर गुन्हा दाखल

Image
इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्ट  व्हिडिओ टाकणाऱ्या दोघा विरोधात गुन्हा दाखल       शनिवारी  4 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीरामपूर येथून दोन तरुण लोणी परिसरात गेले होते तेथे त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केला      व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूर वरून लोणी येथे कॉलेजला आलेला मुलींची टिंगल टवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून आले.     त्यांचा उद्देश हा केवळ मुलींची छेड काढणे  हा असल्याचे इंस्टाग्राम वरील व्हिडिओ वरून दिसून आल्यावर पोलिसांनी या दोघेही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले ते आरोपी   शाहिद हुसेन शेख, वय 21 वर्षे राहणार श्रीरामपूर   सात हशम सय्यद, वय 20, राहणार   श्रीरामपूर         या दोघेही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून  गुन्हा रजिस्टर नंबर 548/2025 कलम भारतीय न्याय संहिता 62, 79 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112,117अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून...

राहुरी व श्रीरामपूर सर्वसाधारण संभापती

Image
घाडगे न्यूज- आपला कारभारी कोण  अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती संभापती पदाचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी घोषित केले  पंचायत समिती सभापती आरक्षण- संगमनेर अनुसूचित जाती व्यक्ती , कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण व्यक्ती ,  शेवगाव सर्वसाधारण ,  राहुरी सर्वसाधारण ,  पारनेर सर्वसाधारण महिला ,  श्रीगोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,  कर्जत नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती' ,  राहता नाम प्र महिला , नेवासा नाम व्यक्ती ,  पाथर्डी अनुसूचित जाती महिला , नगर सर्वसाधारण महिला , जामखेड नाम प्र , महिला अकोले अनुसूचित जमाती

देवळाली प्रवरा व श्रीरामपूर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष

बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा व श्रीरामपूर  सर्वसाधारण  खुल्या प्रवर्गात नगराध्यक्ष होणार  जिल्ह्यातील चार नगरपालिका नवदुर्गेच्या हाती  मुंबई नगरपालिका व नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सुरु असुन आत्ता हाती आलेलया माहीती नुसार तीन नगरपालिका व नगर पंचायत कारभार नवदुर्गाच्या हाती गेल्या असुन तीन खुल्या व एक  संगमनेर, शेवगाव, जामखेड  खुल्या महिला तर शिर्डीत महिला एस टी राखीव

शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आदर्श निर्माण केला-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Image
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रतिनिधी- , सहकार क्षेत्रात सीएनजी व पोटॅश निर्मितीच्या माध्यमातून व त्याची विक्री व्यवस्था करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने देशात १५ सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्रातील अधिकाधिक कारखान्यांचा त्यात सहभाग असेल, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकार निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना (कोपरगाव) येथे देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी.) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोह...

पुरग्रस्त शेतकरयांना केंद्र मदत देईल-केद्रीय गृहमंत्री अमित शाह

Image
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रतिनिधी-  अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी अमित शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी  उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, केंद...