का अस राहुरीना आपल्या समाजना नगराध्यक्ष असा

का अस राहुरी समाजना साठी आरक्षीत व्हयना अस !
स्पेशल रिपोर्ट 
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे 
राहुरी नगरपालिका नगराध्यक्ष पद आदिवासी समाजाचे आरक्षण निघाले अण आदीवासी समाजन आनंद व्हायना.... 
तसा आदीवासी समाज हा रामायणा पासून प्रामाणिक आहे कारण शबरीची उष्टी बोर रामानी खाल्ले असा उल्लेख अनेक वेळा केला जातो.
इतके कशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शबरीकुंभ भरविला होता व त्याला राहुरीचे आदीवासी गेले होते. 
कधी काळी आदीवासी समाजातील मुले आपल्या वस्ती जवळ चिल्लर अधवा पत्ते खेळताना दिसायचे आता मात्र हेच मुले शिक्षण घेतल्याने त्यांची बोटे संगणकावर खेळु लागले.
राहुरी नगर पालिकेचा नगराध्यक्ष आता आपल्या हाटीतला व्होणार म्हणून राहुरीना नगराध्यक्ष पद आदीवासीना व्हयना अस म्हणत राहुरी झाली  बावरी 
जनतेतुन  थेट नगराध्यक्ष  खुर्चीवर जाऊन बसणार असल्याने 
आदीवासी नगराध्यक्ष होणार हे खरे असले तरी प्रस्थापित लोक इतक्या सहजा जमु देत नसतात कारण पालिकाचा व्याव्हार मोठा असतो सहजासहजी इतराना समजता कामा नये म्हणून सगळी यंत्रणा काम करत असते शक्यतो राहुरीत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही जनसेवा व विकास नेत्याचे सोईने राजकारण करावे लागते .
निवडणूक जवळ आल्याने नगर पालिकेवर मोर्चे झाले. खड्यात आघोळी झाल्या आणखी बरेच काही. 
राहुरीवर तसे तनपुरे यांचे वर्चस्व
मात्र पालिकेच्या लेटरहेडवर गेले अनेक वर्ष कमळाचे चिन्ह होते हे त्यांच्या लक्षात कसे आले नाही. 
येथे  आजवर अनेक दिग्गज नेते नगराध्यक्ष  म्हणून कारभार केला असला तरी दिवंगत  नगराध्यक्ष लालाशेट बिहाणी यांचे नाव आज ही घेतले जाते एक गोळ्या भिस्किट विकणाराने नगराध्यक्ष झाल्यावर शहराचा चेहरा मोहरा बदलु शकतो शहात फडच्या बसवल्या तर महामंडळाची एस टी बस जप्त करुन नगराध्यक्षचा अधिकार काय असतात ते दाखवून दिले . आरक्षण नसताना देखील अल्पसंख्याक लोकांनी पालिकेचे नगराध्यक्ष पद भुषविले आहे. 
राहुरी नगर पालिकेत थेट जनतेतुन पहिल्या महिला नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे या झाल्या तर मागील पंचवार्षिक मध्ये त्याचे पुत्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील नगराध्यक्ष झाले व नंतरते आमदार झाले पहिल्यांदाच आमदार होऊन ते राज्यमंत्री देखील झाले .तस राहुरीच्या मंत्री पदाला राहुची अडसर दुर केली तरीअडीच वर्षानी मात्र गोहाटीच्या कामाख्याने चमत्कार केला व त्यांचे मंत्रीपद गेले मग पराभूत व आत्ताचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले सक्रीय झाले आणि सरकारी यंत्रणेवर ताबा मिळवून आपला घाटाच्या वरचा खाक्या दाखवला उंबरे तसेच गुहा प्रकरणात ठोस भुमिका घेतली तसेच काहीन पासून ठराविक अंतर ठेवून काम केले .
 मागील निवडणुकीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे ज्यांच्या मुळे निवडणून आले त्यांना विसले
ठराविक नेहमीचीच टीम 
काल परवा राजकारणात नवखे आलेले अकोले, कोपरगावचे आमदार दादा राष्ट्रवादीत गेले 
मात्र मामा मुळे प्राजक्त तनपुरे यांना ठोस निर्णय घेता आला नाही कदाचीत ते दादा राष्ट्रवादीत गेले असते तर स्टँडींग सीट म्हणून त्यांना उमेदवारी असती आता त्या झाल्या जर तर च्या गोष्टी 
 राहुरी मधील कमळ प्राजक्त यांनी खोडल्याचा राग भारतीय जनता पार्टीच्या मनात होताच 
 आमदार शिवाजी कर्डिले हतबल होते दक्षिण मध्ये आपले जावाई आमदार संग्राम जगताप उभे असताना त्यांची मोठी कसरत झाली ही कोणा मुळे झाली हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यातल्या त्यात या ठिकाणी बरोबर केले व आपली झालेली चुक सुधरुन घेत 
आपली गेलेली आमदार की 
जागेवर आणली .
मुळात 2001 ला डाॅ उषाताई यांच्या विरोधात डाॅक्टर सुशिला कुलकर्णी म्हणजे दोन वहीनीत लढत करण्याचा  विकास  मंडळ कार्यकर्त्याची इच्छा होती तेव्हा दिवंगत तलाठी नितीन डावखर यांच्या  आई यांना उमेदवार दीली गेली  तसेच मागील निवडणुकीत देखील रावसाहेब चाचा तनपुरे यांना म्हणावी अशी ताकत भेटली नसल्याने चाचा चेअरमन अरुण तनपुरे यांच्या कडे गेले आता विकास मंडळ सैर भैर झाले आहे 
नेते खुज्या विचाराचे जो तो आपले पाहतो. 
आता यावेळेस राहुदीची  निवडणूक कर्डीले व  तनपुरे यांच्या  निवडणूक प्रक्रिया अवलंबून राहणार आहे व कार्यकर्त्याना त्याच्यावर विसबुन राहवे लागणार आहे. 
कोणाला विरोध करण्यासाठीचे बळ कोणात शिल्लक राहीले नाही 
 भाजपाचे आमदार असल्याने त्यांना या नगरपालिकेत आपल्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्या शिवाय पर्याय नाही 
तसे नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्याने तनपुरे कुटुंबातील राजकीय कलह मिटला आहे कारण चेअरमन अरुण तनपुरे यांना आपले पुत्र हर्ष यांना नगरपालिकेचे सुत्र हाती  द्यायचे आहे ते संध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आहेत व त्याचे पुतणे माजी आमदार प्राजक्त तनपुरे खा.शरद पवार राष्ट्रवादीत 
यामुळेच किमान आता नगराध्यक्ष पदा साठी दोन्ही राष्ट्रवादी समोरा समोर लढल्या तरी तनपुरे उमेदवार नसतील. 
तसे चेअरमन अरुण तनपुरे हे नगराध्यक्ष असताना त्यांनी या नगरपालिकेला आर्थिक शिस्त लावली नगर पालिकेचे उत्पन्न वाढवून कामगाराचे पगार वेळेवर केले 
त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणू लढवायची ईच्छा होती तेव्हा खा. शरद पवार यांनी उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते आमदार होऊ शकले नाहीत
 आता घड्याळ, तुतारी, कमळ, मशाल, पंजा देखील वाट पहात आहेत ते उमेदवारांची संभाव्य उमेदवार कोण असतील हे उमेदवारी वरुन समजेल तो पर्यंत आपना नगराध्यक्ष व्हायनाचा नारा जोरात घुमतोय. 
नवी समिकरणे या निमित्ताने पहायला मिळतील नगराध्यक्ष पद एस टी पुरुष प्रर्वागासाठी आरक्षित असल्याने कराटे खेळाडु नारायण माळी, महाराष्ट्र केसरी कुस्ती गुलाब बर्डे, डाॅक्टर अंगराज पवार, कैलास माळी, अरुण दळवी, सुनील पवार, नामदेव पवार यांची नावे संध्या तरी चर्चेत असली तरी प्रत्यक्षात आणखी उमेदवार देखील असु शकतात तेव्हा स्थानिक पातळीवर राजकीय तडजोडी करून निवडणूक होणार की जो तो पक्ष आपले स्वतंत्र उमेदवार देतो हे पहावे लागेल .
काॅगेस, राष्ट्रवादी, शिवसेना 
विरोधात भाजपा, राष्ट्रवादी दादा, निवसेना शिंदे अशी लढत होणार 
नगराध्यक्ष पद आरक्षीत असले तरी नगरसेवक होण्या साठी देखील अनेक इच्छुक आहेत कारण नगरसेवक झाल्यावर यावेळी विधानपरिषद आमदार निवडुन द्यायचा आहे 
नगर पालिका कडुन स्वच्छता, पाणी, वीज या माफक आपेक्षा असतात या मिळाल्या म्हणजे झाले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर