कांद्याचे ठोस धोरणा साठी सरकारला शिफारस करु-पाशा पटेल
कांद्याचे सरकारी धोरण निश्चित करताना शासनाला ठोस शिफारसी करणार - राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल राहुरी - प्रतिनिधी @घाडगे न्यूज कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक असून, कांद्याचा उत्पादन खर्च हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कांद्याबाबत सरकारी धोरण निश्चित करताना शास्त्रीय पद्धतीने नेमका उत्पादन खर्च निश्चित करून शासनाला ठोस शिफारसी करण्यात येतील, असे कांदा धोरण समिती आणि राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कांदा पिकाचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पाशा पटेल यांच्या समितीची चौथी बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना पाशा पटेल बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, समितीचे सदस्य तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हीले, उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा कांदा पैदासकर डॉ. बी.टी पाटील, राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. थंगा स्वामी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य...