फुले डिजीटल उपयुक्त
फुले डिजिटल उपयुक्त फुले बळीराजा डिजीटल कृषि सल्ला प्रणाली प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहचणे गरजेचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार शेतकर्यांना कृषि विषयक सल्ला वेळेवर मिळणे महत्वाचे असून विद्यापीठाने तयार केलेली फुले बळीराजा ही डिजीटल कृषि सल्ला देणारी प्रणाली स्थानिक परिस्थितीनुसार वेळेवर व अचूक सल्ला देणारी आहे. भारत सरकारच्या डिजीटल भारत संकल्पनेला महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेले फुले बळीराजा हे अॅप पुरक असून ते प्रत्येक शेतकर्यांपर्यत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि विद्यापीठ, जी.आय.झेड., मॅनेज आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने फुले बळीराजा या डिजीटल कृषि सल्ला प्रणालीची ओळख या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते...