Posts

Showing posts with the label 17 सप्टेंबर पासून सुरुवात

स्वच्छता अभियान सेवा म्हणून राबवा-मुख्यकारी अधिकारी आनंद भंडारी

Image
स्वच्छता अभियान सेवा म्हणून  ग्रामपंचायतीनी उत्तम राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी- आनंद भंडारी प्रतिनिधी -  अभियान कालावधी : १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५   स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहीम १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२५ साठी "स्वच्छोत्सव" ही थीम निश्चित केली असून खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत   शनिवारी १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोहिमेचा शुभारंभ तालुका व गाव पातळीवर परिसर स्वच्छतेच्या उपक्रमाने होत आहे. स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची निवड करून मॅपिंग व साफसफाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – संस्था, प्रतिष्ठान व गर्दीच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येईल. सफाईमित्र सुरक्षा शिबिरे – सफाई...