मॅकनेकल झाले आता विसापूर चे बंदी
मेकॅनिक झाले विसापूर कारागृहातील 'बंदी' शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी विसापूर खुल्या कारागृहातील बंद्यांच्या हाताला आता कौशल्याचे बळ मिळणार आहे. कारागृहातील बंद्यांसाठी दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या दुरुस्तीचे (मेकॅनिक) प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून, हे पाऊल त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने विसापूर जिल्हा खुले कारागृह (ता. श्रीगोंदा) येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, जन शिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार व कारागृह अधीक्षक विजय सोळंके यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. याविषयी माहिती देताना पंतम म्हणाले , केवळ शिक्षा भोगणे हा उद्देश नसून भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर बंद्यांना बाहेरच्या जगात वाहन दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय...