आई समवेत ठेवले तीच्या अल्पवयीन मुलांना तुरुंगात
📌 आरोपी सोबत तीच्या अल्पवयीन मुलांना ठेवले पोलीस कोठडीत.! 📌 राहुरीच्या पोलिस कोठडीत अल्पवयीन मुलांचा तब्बल ७९ दिवस मुक्काम म्हणून.. 📌 प्रहारचे आप्पासाहेब ढूस यांची बाल हक्क आयोगाकडे तक्रार..! 📌 सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे .. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश..! राहुरीच्या पोलिस कोठडीत अल्पवयीन मुलांचा तब्बल ७९ दिवस छळ झाला असल्याने तात्काळ या घटनेची चौकशी करण्यात यावी व त्या अल्पवयीन मुलांना न्याय मिळावा म्हणून प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग नवी दिल्ली तसेच बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई व मे. प्रधान जिल्हा न्यायाधिश साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्या नगर यांना पत्र देवून घटनेची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली होती.. त्यानुसार सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे .. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना ईमेल द्वारे आदेश दिले आहे. ...