आधी महामार्ग चे काम पूर्ण होऊ द्या मग पाहू.....डाॅक्टर सुजय विखे-पाटील
आधी महामार्ग काम पूर्ण होऊ द्या, मग पाहू… – माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची ठाम भूमिका घाडगे न्यूज । प्रतिनिधी राहुरी — नगर–मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामास गती देण्यासाठी राहुरी येथे आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट व रोखठोक भूमिका घेतली. “आधी महामार्गाचे काम पूर्ण होऊ द्या, त्यानंतर पुढील सर्व प्रश्न सोडवू,” असा ठाम संदेश त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांना दिला. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका घेतली पाहिजे,” असे सांगत डॉ. विखे यांनी कामात गोड बोलण्यापेक्षा थेटपणा आणि जबाबदारी महत्त्वाची असल्याचे ठणकावून सांगितले. नगर–मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून २० फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी व प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगत बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व...