डोक्यावर छत्री पदाला कात्री
डोक्यावर छत्री, पदाला कात्री जबाबदारीची वेळ आता! श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे नाशिकमधील कथित ‘भोगू बाबा’ अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. अंधश्रद्धा, सत्तेची जवळीक आणि संस्थात्मक विश्वासार्हता यांचा धोकादायक संगम या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एक वैयक्तिक निर्णय नसून, तो सार्वजनिक जीवनातील नैतिक जबाबदारीचा मुद्दा ठरतो. अशोक खरात याच्यासोबतचे फोटो, त्याच्या ट्रस्टशी असलेले संबंध आणि त्याला मिळालेला अप्रत्यक्ष आधार—या सर्व बाबी गंभीर आहेत. महिला हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीवरच अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होणे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळेच चाकणकर यांचा राजीनामा हा उशिरा का होईना, पण योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल. या प्रकरणात केवळ एक व्यक्ती किंवा एक संस्था जबाबदार नाही. अनेक राजकीय आणि सामाजिक स्तरांवर अशा भोंदू प्रवृत्तींना खतपाणी घालणारे वातावरण तयार झाले आहे. काही नेत्यांची छायाचित्रे समोर आली असली, तरी त्यांनी घेतलेली ‘मी नाही त...