Posts

Showing posts with the label पक्ष की अपक्ष गुलदस्त्यात...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणूक लढणार....

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे नामनिर्देशनपत्र दाखल करणार मात्र पक्ष की अपक्ष हे गुलदस्त्यात  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारी करणार असले तरी पक्ष की अपक्ष सस्पेन्स अखेरपर्यंत कायम राहिल्याने शेवट पर्यंत तनपुरे यांनी विरोधकांना कोड्यात ठेवले असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे   विकासाच्या दृष्टीने कोणत्याही पक्षाची वाट न पाहता अपक्ष उमेदवारी स्वीकारावी, असा सुर होता ही निवडणूक कार्यकर्ते स्वतःच्या जोरावर लढवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, विद्यमान आमदारांच्या दुःखद निधनामुळे ही निवडणूक होत असून परिस्थिती भावनिक आहे. मात्र, मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. “उद्या सकाळपर्यंत आपण निर्णय जाहीर करू. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आपणही अर्ज भरू,” असे सूचक विधान करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. तसेच, कार्यकर्त...