Posts

Showing posts with the label 10000 हजार डिपॉझिट

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक आचारसहिता लागू-डाॅक्टर पंकज आशिया

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : मतदारसंघाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू  - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया     भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.   यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीसाठीची अधिसूचना ३० मार्च २०२६ रोजी जारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ७ एप्रिल रोजी होईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. मतदान २३ एप...