Posts

Showing posts with the label फसवेगिरी धंदा

श्रध्देच्या आड उभे केले भोगू कॅप्टन अशोक खरात ने साम्राज्य

Image
श्रद्धेच्या आड उभे केले भोगू अशोक खरात ने साम्राज्य फसवणुकीचा धंदा  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  सध्या नाशिकमध्ये स्वयंघोषित ‘भोगू बाबा’ उर्फ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला साधा जमीन व्यवहार करणारा एजंट म्हणून ओळख असलेला अशोक खरात, पुढे ज्योतिष आणि तथाकथित अध्यात्माच्या आडून मोठे साम्राज्य उभे करत गेला, ही बाब समाजासाठी चिंतेची ठरली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील एका छोट्याशा 10×12 च्या खोलीतून त्याच्या ‘कारकिर्दी’ची सुरुवात झाली. सुरुवातीला तो जमीन खरेदी-विक्रीत मध्यस्थी करत होता. मात्र, पुढे त्याने ज्योतिष आणि भविष्यकथनाचा आधार घेत संबंधित व्यक्तींना ‘होरे’ सांगत जमीन व्यवहारात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. हळूहळू त्याची प्रतिमा ‘ज्योतिषी’ म्हणून निर्माण झाली आणि त्यातूनच त्याला प्रसिद्धी मिळू लागली. या प्रसिद्धीमुळे अनेक उच्चशिक्षित व्यक्ती, अधिकारी, राजकीय नेते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकही त्याच्या जाळ्यात अडकले. जमीन व्यवहारासोबतच त्याने विविध ‘खडे’, अंगठ्या आणि अन्य तथाकथित उपाय विकण्याचा व्यवसाय सुरू केला. व...