दैनंदिन पाण्याला जपून वापरा
दैनंदिन पाण्याचे महत्व आहे वाणी व पाणी जपुन वापर करायला हवा वाणी मुळे आपला वर्तमानकाळ चांगला जाईल तर पाण्या मुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित राहाणार आहे . तेव्हा सुरक्षित भविष्य साठी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करायला पाहीजे पाणी हे आपले राष्ट्रीय संपत्ती आहे तीचा योग्य वापर करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे पाण्याच्या नियोज व काटकसर फायदेशीर असते. विविध मार्गांनी जास्तीत जास्त पाण्याचे शक्य तितके नियोजन करुन व त्याचा कसा उपयोग होईल यावरून जलसंधारणाच्या कामाचे मोजमाप होत असतं . पावसाळ्यात पुराचे जे पाणी नद्यांतून वाहत जाऊन समुद्रास मिळते ते पूर्णपणे वाया जाते. हे पुराचे पाणी थोपविणारे नदी जोड प्रकल्प भविष्यात राबवणे गरजेचे आहे किंवा तसेच रेनवाटर हार्वेस्टीग तसेच वाटर रिसायकलिंग प्रकल्प जुरुची आहे पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी व मानवी आरोग्यासाठी, वनस्पतिसंवर्धानासाठी, अन्नधान्यसमृद्धीसाठी व खाद्यनिर्मितीसाठी, मत्स्योत्पादनासाठी, सिंचाईसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, विद्युत् निर्म...