Posts

Showing posts with the label बांधावर

पारगावची शेती ब्रँड म्हणून तयार व्हावी- गणेश शिदे

Image
पारगावच्या नांवाने शेतमालाचा ब्रँड तयार व्हावा - कार्यकारी परिषद सदस्य  गणेश शिंदे जोपर्यंत  घामाला प्रतिष्ठा मिळत नाही तोहोर शेतकरी आर्थिकदृट्या संपन्न होत नाही तोपर्यंत गाव समृध्द होणार नाही. आपण जर नवनविन तंत्रज्ञान अवगत केले तरच आपण बाजारात टिकू शकू. जग बदलत असून आपणही बदलत्या काळानुसार, वेळेनुसार शेतीमध्ये बदल केले पाहिजेत. कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषि विभागाच्या योजना यांचा आपण अवलंब करायला हवा. शेतीमध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन मुल्यवर्धनाने पारगावचा ब्रँड तयार झाला पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पारगाव, ता.जि. अहमदनगर येथे शेतकरी मेळाव्यात  गणेश शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील होते. ...